मोटार सायकल घसरून दोघेजण जखमी.

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर- देवकर पाणंद परिसरात मोटारसायकल घसरून झालेल्या अपघातात संग्राम शशिकांत पोवार (वय 30.रा.कौलव ता..राधानगरी) आणि विकास नाथाजी कुंभार (वय.29.रा.केळोशी ,कुंभारवाडी)   हे जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी (ता.27) रात्री साडेअकराच्या सुमारास झाला असून त्या परिसरातील नागरिकांनी उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

-------------------

शिवाजी पेठ येथे एकास मारहाण.

कोल्हापूर -शिवाजी पेठ येथे किरकोळ कारणातुन झालेल्य मारहाणीत गणेश रघुनाथ चौगुले (वय 44.रा.खंडोबा तालीम )याला दोघां जणानी मारहाण केली.हा प्रकार शनिवार (ता.25) रोजी रात्रीच्या सुमारास घडला होता.चौगुले हे  मंगळवारी (ता.28) उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल झाले.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

---------------

मारहाणीत दोघे जण जखमी.

कोल्हापूर-राजारामपुरी परिसरात असलेल्या माऊली चौकात झालेल्या मारहाणीत मारुती सिध्दाप्पा शिंगाडे (वय 45.) व अरुण आत्माराम चौगुले (वय 50.दोघे रा.14 वी गल्ली ,राजारामपुरी)हे दोघे जण जखमी झाले आहेत.हा प्रकार सोमवारी (ता.27) रोजी रात्रीच्या सुमारास घडला असून त्यांना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

------------------------------

सौर ऊर्जेच्या प्लेटाची चोरी.

कोल्हापूर - करवीर तालुक्यातील कंळबे तर्फ ठाणे येथे बोअरवेल साठी लावलेली शेतातील सौर ऊर्जेच्या प्लेटाची चोरी केल्याचा प्रकार घडला आहे.हा प्रकार शुक्रवारी (ता.24) रोजी सकाळी निदर्शनास आले असून याची फिर्याद बाळासो बापू चव्हाण (वय 76.रा.कंळबे तर्फ कळे) यांनी करवीर पोलिस ठाण्यात दिली.त्यानी फिर्यादीत दहा हजार रुपयांच्या प्लेटाची चोरी झाल्याचे म्हटले आहे.करवीर पोलिसांनी          अनोळखी व्यक्तीच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post