प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर -शुक्रवार ता.17/05/2024 रोजी करवीर पोलिसांनी गर्भपात टोळीचा पर्दापाश करून डॉक्टरसह चौघांना अटक करून चिखली ,मडिलगे खुर्द.येथील सोनोग्राफी मशीनसह इतर साहित्य जप्त करण्यात आले होते.पण यातील सहभाग असलेले एंजट आणि इतर पोलिसांच्या रडावर आहेत.या अवैद्य गर्भलिंग निदान आणि गर्भपात करण्यारया टोळीचा प्रमुख डॉ.हर्षल रविंद्र नाईक -परुळेकर (रा.फुलेवाडी रिंगरोड ,कोल्हापूर) आणि विजल लक्ष्मण कोळसकर (मडिलगे खुर्द.ता.भुदरगड) या दोघांना पन्हाळा,राधानगर आणि भुदरगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या गुन्हयातील हे आरोपी असल्याचे करवीर पोलिसांनी केलेल्या तपासात निदर्शनास आले.त्यांना गर्भपाताच्या गोळ्या पुरवठा आणि सोनोग्राफी मशीन उपलब्ध करून देणारयां संशयीताची माहिती मिळाली असून त्यांच्यावर लवकरच अटकेची कारवाई होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
करवीर पोलिसांनी उघडकीस आणलेल्या टोळीच्या तपासातुन कोल्हापूर जिल्ह्यात चालू असलेले बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि गर्भपाताची वाढ़ती व्याप्ती समोर आली आहे.अटकेतील डॉ.हर्षल नाईक परुळेकर ,एंजट युवराज चव्हाण ,विजय कोळसकर आणि संजय पाटील (वरणगे पाडळी) यांच्याकडे केलेल्या चौकशीतुन महत्वाची माहिती करवीर पोलिसांच्या हाती लागली असून या टोळीचा प्रमुख हर्षल याच्यावर दोन वर्षापूर्वी पन्हाळा पोलिसांत बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि गर्भपात प्रकरणी सहभाग असल्याचा गुन्हा दाखल झाला होता.आणि एंजट कोळसकर याच्यावर राधानगर आणि भुदरगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.यांनी एंजटगिरी करून अनेक महिलांना बोगस डॉक्टरांच्याकडे पाठविल्याचे तपासात उघडकीस आले.
या कारवाईत पोलिसांना पहिल्यादाच सोनोग्राफी मशीन मिळाले असून या अटक केलेल्या संशयीतानी किती रुपयांना,कुणाकडून खरेदी केले तसेच किती महिलांची तपासणी केली.याचा तपास पोलिसांच्या कडुन चालू आहे.या बाबतीत संशयीतानी अजून तोंड उघडले नसले तरी त्यांना लवकरच बोलते करू.असे करवीर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांनी माहिती दिली.