वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून महिलेची पोलिसांत तक्रार.
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - कोल्हापूर जिल्हा परिषदेत कार्यरत असलेल्या लोकाधिकार्याकडून लज्जा उत्पन्न होईल असे व्यक्तव्य करून गेल्या दोन वर्षांपासून वारंवार त्रास देत असलेला लेखाधिकारी दिपक बाळासाहेब माने यांच्यावर महिलेने मंगळवार (दि.21) रोजी शाहुपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी दिपक मानेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की ,दिपक माने हा कामाच्या निमित्ताने बोलावून केबीन मध्ये गेल्यावर हाताला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत "तु मला खूप आवडतेस ,आज घरात कोणी नाही,तुझ्यासाठी केक आणला आहे.माझ्या बरोबर चल अशा प्रकारचे मनात लज्जा उत्पन्न होईल असे वक्तव्य करून वारंवार त्रास देत होता.तसेच डिसे.23 मध्ये ऑफिसच्या कामासाठी पुण्याला जात असताना कार मध्ये पुढ़े बसण्यास सांगून गिअर बदलण्याच्या निमीत्ताने अंगाशी लगट करून स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होता.यांच्या अशा वागण्याला कंटाळुन या महिलेने मंगळवार (21) रोजी शाहुपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.शाहुपुरीचे पोलिस निरिक्षक अजयकुमार सिंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक प्रधान तपास करीत आहेत.