प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर /कागल -कागल येथे दिं.10/05/2024 रोजी साडेतीनच्या सुमारास सांगाव रोड परिसरात असलेल्या शाहूनगर येथे विज पडून नामदेव अशोक कासोटे (वय 30.रा.कागल) हा गंभीर जखमी झाल्याने त्याच्या मित्राने 108 ॲम्बुलन्स मधून सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.याची फिर्याद त्याचा मित्र अमर रविंद्र माने (रा.कागल )याने सीपीआर पोलिस चौकीत दिली.
अधिक माहिती अशी की,आज दुपारच्या सुमारास वादळ वारा सुटल्याने पाऊस येण्याची शक्यता वाटल्याने शाहूनगर येथे सतीश कुंभार याची विट भट्टी असल्याने सात आठ जण विट भट्टीवर कागद झाकण्यासाठी गेले होते.त्या वेळी तेथे विज पडून आठ जण जखमी झाले त्या पैकी तिघे जण सीपीआर रुग्णालयात उपचार घेत असून बाकीचे खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.