बांबवडे येथे झालेल्या अपघातात एक जण ठार.



प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापुर /बांबवडे -  बांबवडे ते कोकरुड रोडवर झालेया अपघातात विनायक दत्तात्रय पोळवणकर (वय 40.रा.पोष्ट ऑफिसजवळ ,कोकरुड ता.शिराळा जि.सांगली ) याचा शुक्रवार दि.24/05/2024 रोजी दुपारी दोनच्या सुमारास मोटरसायकल आणि कमांडर याची समोरासमोर धडक होऊन  विनायक हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना 108 अय्म्बुलन्स मधून त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा दुपारी 5 च्या सुमारास मृत्यु झाला.याची फिर्याद सतीश मधुकर पोळवणर यांनी सीपीआर पोलिस चौकीत दिली आहे.

अधिक माहिती अशी की, यातील मयत आपल्या पत्नी समवेत मोटारसायकल वरुन कामा निमीत्त बांबवडे येथे गेले होते.परत येत असताना बांबवडे ते कोकरुड मार्गावर त्यांच्या मोटारसायकलची आणि कमांडर गाडीची समोरासमोर धडक झाल्याने विनायक गंभीर जखमी झाल्याने त्यांच्या नातेवाईकांनी 108 अय्म्बुलन्स सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा उपचारापूर्वी मृत्यु झाला.तर त्यांची पत्नी जखमी झाली असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.विनायक यांचे कोकरुड येथे स्टेशनरीचे दुकान आहे.त्यांना दोन लहान मुली आहेत.या अपघाताची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post