प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - कॉम्प्रेसर मशीन मध्ये साडीचा पदर अडकून कविता दिपक पोकळे (वय 36.रा.देवठाणे.ता.पन्हाळा) या गंभीर जखमी झाल्या असून प्राथमिक उपचार मार्केटयार्ड येथील हिरा नर्सिंग होम मध्ये केले असून पुढ़ील उपचारा साठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.याची फिर्याद उदय महादेव पाटील (वय 33 रा.भुये ता.करवीर )यांनी सीपीआर पोलिस चौकीत दिली.
अधिक माहिती अशी की,कविता पोकळे या शिरोली येथे श्री माणकेश्वर इंडस्ट्रीज (एमआयडीसी) येथे नोकरी करतात रविवार दि.05/05/2024 रोजी कामावर असताना त्यांच्या साडीचा पदर कॉम्प्रेसर मशीन मध्ये अडकल्याने त्या गंभीर जखमी झाल्या .हा प्रकार साडे तीनच्या सुमारास घडला असून त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.सध्या त्या बोलण्याच्या स्थितीत नाहीत.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.