प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - शाहुवाडी तालुक्यातील बांबवडे येथे सुट्टी साठी मावशीकडे आलेला सर्वेश सुजित राऊत (वय 10रा.जवाहरनगर ,इंचलकरंजी) हा क्रिकेट खेळत असताना पाण्याच्या टाकीत पडलेला बॉल काढ़त असताना पाण्यात पडला असता नातेवाईकांनी बाहेर काढून बेशुध्दावस्थेत उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचार चालू असताना बुधवारी (ता.15) रात्री त्याचा मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.या घटनेने त्याच्या नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे.
सर्वेश हा शाळेला सुट्या पडल्याने बांबवडे येथे मावशीकडे गेला होता.तेथे गल्लीतील मुला सोबत क्रिकेट खेळत असताना इमारतीत तळमजल्यावरील असलेल्या पाण्याच्या टाकीत बॉल पडला तो काढ़ण्यासाठी गेला असता पाण्यात बुडाला .हा प्रकार इतर मुलांच्या लक्ष्यात येताच त्याला पाण्यातुन बाहेर काढ़ले.त्याला निवास वासुदेव चौगुले यांनी बेशुध्दावस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचार चालू असताना त्याचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले .