पेंटींग करणाऱ्या तरुणाचा मृत्यु.

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - पेंटींग काम करणारा वैभव दत्तात्रय कांबळे  (वय 30 .रा.मुळ गाव मिरज ,सध्या रा.किणी ,ता.हातकंणगले) याला फिटस आली असता त्याला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारा पूर्वीच मृत्यु झाला.

 ही घटना शुक्रवार दि.03/05/24 रोजी दुपारी अडीच च्या सुमारास घडली.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
अधिक माहिती अशी की,यातील मयत वैभव हा किणी येथील रोहन समुद्रे यांच्याकडे पेंटींगची कामे करत होता.सध्या जठारवाडी येथे संजय वसंत खाडे यांच्या घराचे रंगकाम चालू होते.आज दुपारी जेवणाची सुट्टी झाल्यानंतर मयत  वैभव  आणि मालक रोहन समुद्रे बोलत बसले होते.अचानक वैभवला फिट आल्याने रोहन याने संजय खाडे यांच्या स्विफ्ट गाडीतुन उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारापूर्वी मृत्यु झाला.या घटनेची माहिती त्याच्या नातेवाईकांना समजताच सीपीआर रुग्णालयात दाखल झाले.वैभव हा किणी येथे त्याच्या  शरद धनवडे ( दाजी ) यांच्या कडे गेल्या काही वर्षापासून रहात होता.या घटनेची फिर्याद शरद धनवडे यांनी सीपीआर पोलिस चौकीत दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post