पोर्ले तर्फ ठाणे येथे पूर्वीच्या वादातुन तरुणाचा खून.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - पोर्ले तर्फ ठाणे येथे विकास आनंदा पाटील (वय 40.रा.पोर्ले तर्फ ठाणे ) याचा रविवार दि.19/05/2024 रोजी सायंकाळी साडेच्या  सहाच्या सुमारास झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने त्याच्या नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारापूर्वी मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.याची फिर्याद त्याचा चुलत भाऊ अजित सुरेश पाटील यांनी सीपीआर पोलिस चौकीत दिली.

                    आरोपी युवराज गायकवाड.

अधिक माहिती अशी की,विकास आनंदा पाटील याचा त्याच गावातील युवराज शिवाजी पाटील (वय 40.रा.पोर्ले तर्फ ठाणे) हा आर्मी मध्ये असून याच्याशी दोन तीन महिन्यांपूर्वी वाद होऊन त्यांच्यात मारहाण झाली होती.त्या वेळी हा वाद मिटविण्यात आला होता.काल युवराज शिवाजी गायकवाड हा सुट्टी साठी आला होता.विकास हा आपल्या आई समवेत शालाबाई आनंदा पाटील यांच्या समवेत शेतात धार काढ़ण्यासाठी गेला होता.दुचाकी वरुन परत येत असताना निटवडे फाटा येथे चार चाकीतुन आलेल्या युवराज आणि  त्याच्या दोन साथीदारांनी  विकासला अडवून युवराज आणि त्याचे दोन साथीदारांनी हातात दांडके घेऊन मारहाण करण्यात सुरुवात केली.या वेळी विकासची आई गयावया करून मुलाला मारु नका म्हणून हातापाया पडू लागली.तिचे काही न ऐकता ते मारतच राहिले या मारहाणीची माहिती त्याच्या मित्रांना समजताच त्याचे मित्र विश्वास पाटील आणि भोपळे या मित्रानी युवराज तावडीतुन सुटका करून विकास याला या दोघांनी दुचाकीवरुन उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचार चालू असताना मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.विकास हा शेती करीत असून तो विवाहीत असून त्याला एक मुलगा आणि मुलगी असून मुलगी दहावीत शिकत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post