प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : रायगड जिल्ह्यातील महाड येथील आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो असलेला छायाचित्र फाडले. या कृतीचा निषेध इचलकरंजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात जोरदार निदर्शने करून जाहीर निषेध करण्यात आला.
यावेळी भाजपा ग्रामीणचे सरचिटणीस शहाजी भोसले म्हणाले गेल्या दोन महिन्यापासून सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपा आरक्षण बदलणार म्हणून टाहो फोडणाऱ्या शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देशाचे संविधान लिहणारे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र असलेला फोटो फाडून त्यांचा अपमान केला असून या कृतीमुळे महाविकास आघाडीचे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्यावर असणारे बेगडी प्रेम दिसून आले आहे असा आरोप करत त्यांच्या या कृतीचा जाहीर निषेध केला.
यावेळी सौ.नागुताई लोंढे, सौ.नीता भोसले, सरचिटणीस बालकृष्ण तोतला, अनिस म्हालदार, उमाकांत दाभोळे, अमित जावळे, प्रदीप मळगे, अमर कांबळे, मनोज साळुंखे, जहांगीर पटेकरी, प्रसाद खोबरे, कबनूर अध्यक्ष जयकुमार काडाप्पा, शिवानंद रावळ, मारुती पाथरवट, प्रविण पाटील, अर्जुन सुतार, हेमंत वरुटे, अरुण कुंभार, शंकर झित्रे, नामदेव सातपुते, जयवंत पाटील, नितीन पडियार, अलीहुसेन खान, राजेंद्र पाटील, गणेश पिसके, सुरज आडेकर, प्रदीप कांबळे, दिपक कडोलकर, वसंत पवार, बाबासाहेब गाडे, म्हाळसाकांत कवडे आदी सह भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्याने उपस्थित होते.