प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आज मंगळवार दि. १४ मे रोजी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त महानगरपालिका सभागृहामध्ये त्यांच्या प्रतिमेस आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांच्या हस्ते आणि उपायुक्त प्रसाद काटकर आणि स्मृती पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले.
याप्रसंगी मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, सहा.आयुक्त विजय राजापुरे, आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार, उद्यान पर्यवेक्षक सुनील बेलेकर, माहिती व जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे, क्रीडा अधिकारी संजय शेटे, स्वच्छता निरीक्षक सुर्यकांत चव्हाण,महिला बालकल्याण अधिकारी सीमा धुमाळ, खरेदी पर्यवेक्षक शितल पाटील, ग्रंथपाल बेबी नदाफ, सदाशिव शिंदे, शितल पाटील, सदाशिव जाधव, प्रदीप झमरी, युवराज भोसले, अमोल कुलकर्णी भारत कोपार्डे, सचिन शेडबाळे आदि उपस्थित होते.