प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी काल पंचगंगा नदी घाट आणि परिसराची पाहणी केली होती. त्या ठिकाणी अस्वच्छता असल्याचे निदर्शनास आलेने तातडीने नदी घाट परिसराची स्वच्छता करून घेणेचे आदेश आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार यांना दिले होते.
या आदेशानुसार आज शनिवार दि.११ मे रोजी आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाच्या वतीने पंचगंगा नदी घाट आणि परिसराची स्वच्छता करणेत आली. याठिकाणी मोठ्या प्रमाणात असलेला प्लॅस्टिक कचरा, नागरिकांनी टाकलेली कपडे गोळा करणेत आली.
यावेळी कार्यकारी अभियंता सुभाष देशपांडे, विजय पाटील, संजय कांबळे यांचेसह आरोग्य विभागाकडील स्वच्छता निरीक्षक, आणि कर्मचारी उपस्थित होते.