मतदार जनजागृती साठी आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांची शहरातील सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींच्या सोबत बैठक संपन्न.



प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी :  सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रात आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांचेकडून स्वीप अंतर्गत विविध उपक्रम राबविणेत येत आहेत.  या अनुषंगाने आज शहरातील सर्व सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींच्या सोबत पॉवरलुम क्लॉथ ॲड यार्न असोसिएशन, कागवाडे मळा येथे बैठकीचे आयोजन केले होते.

सदर बैठकीस शहरातील विविध सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

          या प्रसंगी आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी मागील लोकसभा निवडणुकीत महानगरपालिका क्षेत्रात झालेल्या मतदानाचा आढावा घेऊन शहरात काही मतदान केंद्रावर कमी मतदान झालेचे निदर्शनास आणून दिले आणि ७ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी महानगरपालिका क्षेत्रात सर्वच ठिकाणी जास्तीत जास्त मतदान‌ व्हावे आणि सर्वांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावावे यासाठी आपण सर्वांनी प्रथम मतदान करावे आणि आपल्या सोबत अन्य मतदारांना मतदान करणेस प्रोत्साहित करणेस विशेष सहकार्य करावे असे आवाहन केले. त्याचबरोबर यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी मतदार प्रतिज्ञा ग्रहण केली.

    या बैठकीस महानगरपालिका उपायुक्त प्रसाद काटकर, दगडुलाल मर्दा चॅरिटेबल ट्रस्टचे शाम सुंदर मर्दा यांची प्रमुख उपस्थिती होती.


       

Post a Comment

Previous Post Next Post