महानगरपालिका उपायुक्त प्रसाद काटकर यांचेकडून मान्सूनपुर्व तयारीचा आढावा

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

 इचलकरंजी,  :  सन २०१९ आणि २०२१ सालातील पुरपरीस्थितीचा पुर्वानुभव लक्षात घेता आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांच्या निर्देशानुसार इचलकरंजी शहरातील  संभाव्य पुर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर  महानगरपालिका उपायुक्त प्रसाद काटकर यांनी महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत मान्सुनपुर्व तयारीचा आढावा बैठकीमध्ये उपस्थित विभाग प्रमुख यांचे कडुन घेतला.

      सदर आढावा बैठकीत उपायुक्त यांनी  मान्सूनपुर्व तयारीच्या अनुषंगाने संबंधित विभाग प्रमुखांना  आवश्यकते नुसार आदेश दिले. यामध्ये प्रामुख्याने 

१) शहरातील धोकादायक इमारत मालकांना नोटीस देणे :-

     उप शहर अभियंता राधिका हावळ.

२) धोकादायक झाडे किंवा त्याच्या फांद्या तोडणे साठी आवश्यक असलेली प्रक्रिया तातडीने पूर्ण करणे:- 

   उद्यान पर्यवेक्षक सुनील बेलेकर

३) शहरातील मोठे नाले / ओढा 

यांचे रुंदीकरण/खोलीकरण तसेच 

सारण गटारींची स्वच्छता करणे :-

 आरोग्य अधिकारी डॉ.सुनिलदत्त संगेवार आणि स्वच्छता निरीक्षक महादेव मिसाळ.

४) आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत सर्व साहित्य आणि मशिनरी सुस्थितीत ठेवणे :-

 अग्निशमन अधिकारी सौरभ साळुंखे आणि संजय कांबळे.

५) आवश्यकतेनुसार मनुष्यबळ आदेश काढणे:-

सहा.आयुक्त तथा कामगार अधिकारी विजय राजापुरे.

       त्याचबरोबर आपत्कालीन परिस्थितीत कोणत्याही विभाग प्रमुखाने मुख्यालय सोडू नये, अत्यावश्यक कारणाशिवाय कोणत्याही अधिकारी कर्मचारी यांना रजा देवु नयेत तसेच 

आपला मोबाईल फोन बंद ठेवु नये असे सक्त आदेश उपायुक्त प्रसाद काटकर यांनी सर्व विभाग प्रमुखांना दिले.


      नितिन प्रभाकर बनगे 

माहिती व जनसंपर्क अधिकारी 

इचलकरंजी महानगरपालिका

Post a Comment

Previous Post Next Post