इचलकरंजीत दंडा विरोधात रिक्षाचाकांचा प्रांत कार्यालयावर मोर्चा

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी : रिक्षा तंदरूास्ती प्रमाणपत्र विलंबासाठी दररोज ५० रुपये दंडास स्थगिती द्यावी यासह विविध मागण्यांसाठी सोमवारी इचलकरंजीतील रिक्षाचालक संघटनांच्या वतीने रिक्षा वाहतूक बंद ठेवून प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास तीव्र आदोलन छिंडण्यात येईल असा जोरदार इशाराही यावेळी देण्यात आला.

रिक्षा ह सार्वजनिक परिवहन असून त्याचे नियमन नियंत्रण शासन,प्रशासना मार्फत चालते. रिक्षा चालकांना तंदुरुस्ती प्रमाणपत्रही घ्यावे लागते. परत् त्यासाठी विलंब झाल्यास दररोज ५० रुपये दंड आकारला जात आहे. यापूर्वी तंदरुस्ती प्रमाणपत्रासाठी माफक फी भरुन अन्य प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र मिळ्त होते. परंतु केंद्र सरकारने अधिसूचना जारी करत दरुस्ती प्रमाणपत्रासाठी विलंब केल्यास दररोज ५० रुपये दंड लागू केला आहे. या विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्याने १७मे पासून वाहनां च्या योग्यता प्रमाणत्रासाठी दररोज ५० रुपये दंड लागू करण्याचे आदेश दिले आहेत, दररोज ५० रुपये असलेला दंड रद्द करावा आदी मागणी रिक्षा संघटनांनी के ली आहे . या मागण्यांसाठी रिक्षाचालकांनी रविवारी रात्री १२ वाजल्यापासून रिक्षा बंद ठेवून सकाळी शिवतीर्थ येथून प्रांत कार्यालयावर मोर्चो काढत प्रांताधिकान्यांना मागण्यांचे निवेदन दिले. मोर्चात नंदा साळुंखे, हरीबा पाटील, रामचंद्र जाधव, मन्सुर सावनुरकर, कयुम जमादार, सुनिल पोवार, अनिल बमन्नवार, शशिकांत माने, राहुल त जाधव यांच्यासह विविध रिक्षा संघटनांचे पदाधिका्यांसह रिक्षाचालक सहभागी झाले होते.

Post a Comment

Previous Post Next Post