मुक्ताविष्कार धम्म संस्कार कार्यशाळा पेठ वडगाव येथे संपन्न

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

 प्रतिनिधी  /  संदीप कोले 

त्रिरत्न बौद्ध महासंघ, कोल्हापूर संचलित, अश्वघोष सांस्कृतिक बुद्धिस्ट केंद्र आयोजित मुक्ताविष्कार धम्म संस्कार कार्यशाळा हातकणंगले  तालुक्यातील  पेठ वडगाव* येथे आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेसाठी 27 मुला-मुलींनी सहभाग घेतला. या कार्यशाळेसाठी तिसरी ते बीए पर्यंतच्या विविध जाती धर्मातील मुला, मुलींचा सहभाग होता , 

या कार्यशाळेचे मार्गदर्शक  धम्मचारी आर्यकुमार, प्राध्यापक डॉ. प्रशांत गायकवाड,   डॉ. आनंद भोसले ,कवी,अभिनेते आनंद हाबळे , सुरेश कांबळे, विजय कोसंबी, सिद्धार्थ कांबळे, अशोक कटकोळे, सारिका दीपंकर, राणी कवाळे, संदीप कोले , अंजली कोले ,विशाल कांबळे यांनी मार्गदर्शन व सहकार्य केले.तसेच शीतल कराडे सर यांनी मुलांना केळी दान देऊन सहकार्य केले.

 मुलांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास त्यामध्ये ध्यान, योगा बौद्धिक विकास, सांस्कृतिक विकास, शैक्षणिक विकास, कथेच्या आणि गीतांच्या माध्यमातून महापुरुषांची ओळख, नैतिक मूल्य, कल्पनाशक्तीचा विकास, एकाग्रतेचे विविध खेळ, इत्यादी विषयावर  मार्गदर्शन केले. या कार्यशाळेसाठी पेठ वडगाव, वाठार, नागाव,आष्टा, भुये, कोल्हापूर, मिणचे, हेरले  इत्यादी गावावरून मुलांनी सहभाग घेतला. सहभागी मुला मुलींना सर्टिफिकेट देऊन *मैत्री गीताने* कार्यशाळेची सांगता करण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post