प्रेस मीडिया लाईव्ह :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यंदा ९५.८१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर गतवर्षीच्या तुलनेत त्यात १.९८ टक्क्यांनी वाढ़ झाली. विशेष म्हणजे १८७ विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले आहेत. उत्तीर्ण होण्याची टक्केवारी वाढली त्याचबराबेर १८७ विद्याथ्थ्यानी पैकीच्या पैकी गुण संपादन केले हे उत्तमच झाले.
राज्यातील १५ लाख ४९ हजार ३२६ नियमित विद्याश्य्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी १४ लाख ८४ हजार ४४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची घोषणा करण्यात आली. तर कोकण विभागाने निकालात बाजी मारल्याचेही वृत्त समोर आले. मात्र नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी असल्याची खंत आहे. निकालात मुलांपेक्षा मुलीच्या उत्ती्णतिचे प्रमाण यावेळीही जास्त आहे हे ही एकदम झकासच आहे. यामुळे महिला सक्षमीकरणाकडे गतीमान वाट्चाल सुरु झाल्याचे दिसून येते. ९४.५६ टक्के मूले आणि ९७ टक्के मुलींनी शालांत परीक्षेचा महत्त्वाचा टर्पा पार केला आहे. २३ हजार २८८ शाळांपैकी ९ हजार ३८२ शाळ्ांचा निकाल शंभर टक्के लागला. या वर्षी देखील दहावीच्या परिक्षेत मुलींनी मुलांवर बाजी मारल्याचे स्पष्ट होत आहे. तर अजून बारावीचा निकाल यणे बाकी आहे. त्यातही अशीच भरारी दिसून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. दहावीची परीक्षा सार्वजनिक परीक्षा मंडळामार्फत घेवून निवडक अशी सक्षम मुलेच अकरावीत पाठवलेली असतात, शिवाय त्यानंतर ही मूले आपल्या आवडीचे व स्वत:ला सोपे वाटणारे सायन्स, कॉमर्स, कला अशा अभ्यासक्रमांची निवड करतात.
आता यानंतर जी बिकट शैक्षणिक वाटचाल करावी लागणार आहे त्याची त्यांना कल्पनाही नसेल. खासकरुन ७০ टक्के किंवा त्याहून कमी गुणांनी पास होणार्या मुलामु्लींना अपेक्षित अभ्यासक्रमाला प्रवेश मिळणे अवधड होणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करायला सद्या तरी कांहीच अड्चण दिसत नाही. खाजगी महाविद्यालयांना लाखो रुपयांची डोनेशनरूपी दक्षिणा द्यावी लागणार आहे किंवा नाही हे अद्याप समजत नाही. त्याशिवाय रहिवाशीपणाचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला असे अनेक दाखले मिळवताना पालकांची दमछाक यंदाही होणारच आहे. कौशल्य व स्वयंप्रज्ञा आणि शालेय गुणवत्ता यांचा अनेकदा एकमेकींशी संबंध असतोच असे नाही. बारावीपर्यत शिकवण्या, घोकमपट्टी वगैरे करुन उत्तम यश संपादन करणे शक्य आसते. पण अंगातील गुणवत्तेची खरी कसोटी यापुऱ्ील शैक्षणिक कारकिर्दीतच होणार आहे. मिळवलेल्या ज्ञानाचे उपयोजन करुन जीवनातील समस्या सोडवण्याची क्षमता अंगी येणे हे सर्वात महत्वाचे असते. पदवी किंवा पदवीका उत्तम गुणाने मिळवणे हेच भावी आयुष्यात नोकरी मिळवण्यासाठी व पदोन्नतीसाठी एकमेव प्रमाणपत्र असते असे नाही. उत्तम गुण मिळवणारे अत्यंत कमी विद्यार्थी संशोधनाकडे वळतात. किंवा स्वत,च्या हिमतीवर धडाडीने उद्योगात उतरुन यशस्वी होतात. आपण इतरांकडे नोकरी करणे हे वेगळ्े व स्वयंउद्योग उभारुन इतरांना आपल्याकडे नोकरीवर ठेवणे वेगळे, अशी जिद्द व उमेद असणारे जे स्वयंभू विद्यार्थी अगर विद्यार्थीनी असतात ते गुणपत्रिकेपेक्षा स्वतः च्या हिंमतीवरच अधिक अवलंबून असतात. आता बारावीनंतर युपीएससी किंवा एमपीएससी स्पर्था परीक्षा देवून शासकीय अधिकारी पदावर नियुक्त होण्याचा मार्ग देखील यशस्वी मुलामुलींना खुला आहे. त्यांनी अधिक उज्वल यश मिळवाव, भावी जीवन व देशाला प्रगतीपथावर न्यावे अशा शुभेच्छा! आगामी काळात संपूर्ण बोर्डांचा निकाल जर कधी १०० टक्के लागला तरच आपण सर्वजण शिक्षणाची वाटचाल ख्या अर्थाने यशस्वी करीत आहोत याची जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही. याची सुरुवात तरी महिला सक्षमीकरणापासून होणार आहे.
पूर्वीच्या काळातही तसेच होते आणि आजही आहे. कारण की ज्यावेळी या देशातील महिला शिक्षित होतील तरच त्या सक्षमतेकडे वाटचाल करु शकतील हे सुत्र आजही लागू पडते. परिक्षा देणार्या मुलींपैकी १০০ टक्के मूली ज्या वर्षी उत्तीर्ण होतील त्यानंतरच मुलांची टक्केवारी वाढण्यास मदत होईल असे वाटते. गेल्या दहा वर्षात मुलींची दहावी आणि बारावीच्या परिक्षेत उत्तीर्ण होण्याची टक्केवारी वरषानुवर्ष वाढताना दिसत आहे. ही कामगिरी एकदम उत्तम आहे. यापुढेही अशीच ही टक्केवारी वाढत जायला हरवी.त्यासाठी सरकारने अलिकडील काळात जे प्रयत्न सुरु केले आहेत. ज्या योजना राबवल्या आहेत. त्यांच पध्दतीने यापुढेही ते प्रयत्न सुरु रहावेत आणि योजनाही सुरुच रहाव्यात अशी अपेक्षा. कुमारवयीन मुलींना त्यांच्या घरापासून ते शाळेपर्यंत जाण्यासाठी प्रवासाचे साधन म्हणून यापूर्वी दुचाकी सायकली देण्यात येत होत्या त्या गेल्या वर्षीपर्यंत शासनाकडून देण्यात आल्या असतीलच. आता या पुढेही महिला शिक्षणाची अशीच भरधाव सायकल वेगाने चाललीच पाहिजे