प्रेस मीडिया लाईव्ह :
देशात कोठेही, कोणीही कसलाही उद्योग सुरु करीत असेल तर त्याची माहिती उद्योग विभागाला असलीच पाहिजे. कारण की उद्योगामुळे कोणाचे कसलेही नुकसान तरी होत नाही हे पाहण्याची जबाबदारी त्या विभागाची असते. देशभरात करोडो रसायनांचे कारखाने असतील, राज्यातही करोड़ो असण्याची शक्यता आहे. मुंबई या महाराष्ट्राच्या राजधानीतील डोंबिवली येथील औद्योगिक वसाहतीमधील एका कारखान्यात रसायनांचा स्फोट झाल्याने हा विषय ऐरणीवर येत आहे.
महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ हे कोणत्याही वसाहतीला परवाना देताना कांही अटी घालत असेलच यात शंका नाही. एखादा कारखाना सुरु करण्यापुर्वी किंवा सुरु झाल्यानंतर प्रगतीपथावर असो वा नसो त्याची वर्तमानातील स्थिती आणि परिस्थिती या बाबतची सर्व माहिती संबंधीत विभागाला निरिक्षण करुन नोदंवली जाते. स्फोट कधीही कोठेही कोणत्याही कारणाने होवो ती घटना निश्चितच दुःखदार्ी आहे. काल गुरुवारी डोंबिवली औद्योगिक वसाहती मधील एका रसायन कारखान्यात मोठा स्फोट झाला आणि डोंबिवली दुसऱ्यांदा स्फोटाने हादरल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली. झालेला स्फोट हा अतिशय भीषण होता असे समजते. या स्फोटामुळे औद्योगिक वसाहतीमधील अनेक कारखान्यांचे नुकसान झाले. तर परिसरातील रहिवाशांच्या घरांच्या काचाही फुटल्याचे वृत्त आहे. आताप्यंत या स्फोटामध्ये ९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.कारखान्यात झालेल्या या स्फोटामुळे कारखान्यातील कामगार आणि परिसरातील नागरिकांनाही दुःखापत झाली आहे. ही दुःखापत गंभीर स्वरुपाची आहे. चौकशी दरम्यान या स्फोटाबाबतची आणि घटनेत झालेल्या नुकसानीची माहिती समोर येत आहे. अमुदान नावाच्या कारखान्यात ही स्फोटाची घटना घडली आणि स्फोट इतका मोठा होता की जवळपासचा परिसर स्फोटाच्या हादर्याने नुकसान ग्रस्त बनल्याचे समजते. घरांच्या काचा फुटल्या, या स्फोटानंतर केजीएन केमिकल कंपनी, मेहता पेंट , सप्त वर्ण आणि एका शोरूममध्येही आग लागली. यामध्ये ६४ जण जखमी झाल्याची प्राथमिक नोंद आढळत असली तरी नेमका आकडा अजून वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. जखमींपैकी कांहीजणांवर अतिद्क्षता विभागात उपचार सूरु असल्याचे सांगण्यात येत आहे. उद्योग किंवा कारखाना सुरु करताना त्या कारखान्यात होणा्या विविध प्रक्रियांमुळे परिसरात पर्यावरणाचे कांही नुकसान होणार नाही याची दखल घेण्याचे आदेश संबंधीत कारखाना चालवणार्यांना दिले जातात. त्याचबरोबर कारखान्यातील यंत्रसामग्री सुव्यवस्थित असल्याचीही तपासणी उद्योग मंडळाच्या संबंधीत विभागाकडून होत असेल. कारखान्यांचा विकास होत असताना तसेच प्रतीपथावर जात असताना कारखान्यात नव्याने होणारे बदल ही संबंधीत विभागाने तपासण्याची गरज असते. आता ही नियमावली कोणी पाळत असतील तर नवलाईचे ठरेल. कारण की नुकत्याच घडलेल्या डॉबिवली येथील स्फोटाच्या घटनेनंतर त्या कारखान्याचा बॉयलरचा परवाना होता की नव्हता याबाबत उलटसुलट माहिती समोर येत आहे. कामगारांचा बळी गेला त्यांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई दिली जाईल तेंव्हा जाईल. पण अशा कारखान्यांमध्ये जीवावर उदार होऊन काम करणा्या कामगारांच्या जीवाला असे स्फोट घडल्यानंतर होणा्या धोक्याला जबाबदार कोणाला धरणार हे एकदा सरकारने जाहीर करावे. पोटापाण्यासाठी काम करणारे मजूर मात्र जीवाची पर्वा न करता कोणतेही काम करायला तयार होतात. एखादया दर्घटनेत कामगाराचा बळी जातो आणि त्याचेअख्खे कुटुंब उध्वस्त होते. कांही असो कारखान्यांचा परवाना देणारे, कारखाना चालवणारे, कारखान्याची कमतरता किंवा खराब बाजू दाबून टाकणारे, असे सर्वजण अशा घटनांचे दोषी ठरतात. ते राजकारणी असोत वा मालदार असोत ्यांच्यावर कारवाई या पुर्वी कधी झाल्याचे तरी ऐकीवात नाही. आता या डोंबिवली प्रकरणी कोणास जबाबदार धरुन कारवाई केली जाते हे पहावे लागणार आहे. या घटनेला राजकीय रंग देण्याचा प्रकार घडत असल्याची माहितीही समोर येत आहे. कुजबूज असो वा वास्तवता बेजबाबदार अधिकारी आणि बेजबाबदार कारखाना व्यवस्थापन यांच्यासह कारखाना मालकांवरही कारवाई झाली तर ते नवलाईचे ठरणार
आहे. किमान यापुढे तरी अशा प्रकारच्या घटना घडू नयेत याची दक्षता औद्योगिक विकास महामंडळासह उद्योग नियंत्रण विभाग आणि तेथील अधिकारी घेतील अशी अपेक्षा बाळगायला काय हरकत आहे. यापुढे कोणाचाही कसल्याही प्रकारे बळी जाऊ नये हे आता स्फोटानंतर तरी संबंधीत यंत्रणेने जाणून, समजून, उमजून घ्यावे. अन्यथा लोकांच्या मनांचा स्फोट सुध्दा घातक ठरेल.