प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
गोरेगाव पोलीस ठाणे हद्दीत सपोनी पोमन व पथक यांना गोपनीय बातमीदारा द्वारे खात्रीशीरित्या मिळालेल्या बातमी नुसार दोन इसम समीर अब्दुल कलाम शेकदरे वय 38 वर्ष राहणार शेखाडी तालुका श्रीवर्धन जिल्हा रायगड 2) दानिश रफिक फनसोकर वय 30 वर्ष राहणार शेखाडी. तालुका श्रीवर्धन जिल्हा रायगड हे दोन्ही इसम त्यांच्या सोबत अवैधरित्या चरस हा नशाकारक व मादक अमली पदार्थ सोबत बाळगत विक्री करता येत असल्याबाबत माहिती मिळाल्याने म्हसाळ गोरेगाव रोड वरती गोरेगाव दर्गा येथे नाकाबंदी सापळा लावून पकडले असता त्याच्याकडे 1.37 किलो ग्रॅम चरस अमली पदार्थ किंमत 5,17,500/-रुपये. 1 लाल काळा रंगाची टीव्हीएस कंपनीची मोटरसायकल किंमत 95,000/- रुपये. असा एकूण 6,12,500/- रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे. सदर बाबत गोरेगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 73/2024 गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारा अधिनियम 1985 चे कलम 8 (क), 20 (ब) II (क) प्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कार्यवाही व अधिक तपास गोरेगाव पोलीस ठाणे करीत आहोत.
कार्यवाही पथक -सपोनी / पोमन Asi राजेश पाटील, Asi प्रसाद पाटील, Hc संदीप पाटील, HC म्हात्रे, Hc सुधीर मोरे, HC जेमसे यांनी केला आहे.