कणेरीवाडी येथील कंजारभाट वसाहतीत असलेल्या गावटी दारुच्या हातभट्या उध्दवस्त.

 स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाची कारवाई.


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - करवीर तालुक्यातील कणेरीवाडी येथे असलेल्या कंजाभाट वसाहतीत असलेल्या 7  गावठी दारुच्या हातभट्या उध्दवस्त करून 1लाख 86 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने करुन या प्रकरणी संदिप दिपक घांरुगे (रा.साईनगर ,कंजारभाट वसाहत कणेरीवाडी) यांच्यासह सहा महिलांच्यावर गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की,स्थानिक गुन्हे अन्वेषण यंत्रणेच्या पथकाला करवीर तालुक्यातील कणेरीवाडी येथे असलेल्या साईनगरातील कंजारभाट वसाहतीत पहाटेच्या सुमारास गावठी दारु तयार होत असल्याची माहिती मिळाली असता या पथकातील पोलिसांनी शुक्रवार दि.24/05/2024 रोजी पहाटेच्या सुमारास छापा टाकून 7 गावटी दारुच्या हातभट्या उध्दवस्त करून त्या जागीच नष्ट करून गावटी तयार करण्यासाठी साठी लागणारे 5,600लि.कच्चे रसायन,200 लि.पक्के रसायन आणि 20 लि.तयार असलेली गावटी दारुसह इतर असा एकूण 1 लाख 86 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत,अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर ,पोलिस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.

Post a Comment

Previous Post Next Post