प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - एके काळी सुरक्षेच्या दृष्टिने कंळबा जेलचा दबदबा होता.त्याच कंळबा जेल मध्ये अलिकडच्या काळात मोबाईलसह ,चार्जर ,बँटरयां ,केबल आणि अंमली पदार्थ सापडल्याने कंळबा जेलची सुरक्षा चर्चेत आली होती.काहीच्यावर गुन्हेही दाखल करण्यात आले होते.तर काही अधिकारी आणि कर्मचारी उचलबांगडी करून काहीना बंडतर्फही केले होते.
काही दिवसापूर्वी या जेलचा पदभार स्वीकारलेल्या नुतन प्रभारी अधीक्षक विवेक झेंडे यांनी सर्वच बरयक मध्ये घेतलेल्या झडतीत दि.30/04/2024 पासून ते दि. 11/05/2024 अखेर 25 मोबाईलसह चार्जर ,केबल आणि बँटरयां सापडल्याने जेलची प्रशासन यंत्रणा हादरली आहे.या घटनेची नोंद पोलिसांत झाली नाही.याची जेलच्या वरिष्ठ अधिकारी यांनी दखल घेऊन पुन्हा चौकशीचे आदेश दिल्याचे समजते.कंळबा जेलात दिड महिन्यात झालेल्या झडतीत दिड महिन्यात 100/पेक्षा जास्त मोबाईल सापडल्याचे निदर्शनास आले आहे.मोबाईलसह चार्जर ,केबल आणि बँटरी बरोबर अन्य वस्तु हाती लागल्याने कैद्याची तपासणी आणखी कडक करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
या जेल मध्ये कैदी लपून छपून मोबाईलचा वापर करत असलेल्या कैद्यासह आणि त्यांना उपलब्ध करून देणारयां संशयीताचा छडा लावण्यासाठी सायबर क्राईमच्या विशेष पथकाची मदत घेणार असल्याची माहिती पुढ़े आली आहे.प्रशासनातंर्गत अधिकारी आणि कर्मचारी यांच्या दुर्लक्षामुळे कंळबा जेल अलीकडच्या काळात राज्यभर प्रसिद्ध झोतात आले आहे.
या परिस्थीतीला जबाबदार असलेल्या जेलच्या दोन वरिष्ठ अधिकारी यांच्यासह 11 जणांना काही दिवसांपूर्वी सेवेतुन बंड़तर्फ करण्यात आले आहे.त्या नंतरही विशेष पथकाने केलेल्या झाडा झडतीत मोबाईलसह चार्जर ,केबल आणि बँटरया सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.जेल मध्ये असलेले काही संशयीत कैदी मोबाईलचा वापर करून झाल्यानंतर त्यातील सिमकार्ड काढ़ुन मोबाईल प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळुन जमिनीत पुरल्याचे निष्पन्न झाले आहे.जेलच्या प्रशासनाला जमिनीत पुरलेले दहा मोबाईल शोधुन काढ़ण्यात यश आले आहे.तर काही मोबाईल भिंतीच्या चिरीत आणि खिडकीच्या फटीत सापडल्याचे निदर्शनास आले आहे.