प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - इंचलकरंजी शहरात धुमाकुळ घालणारयां जर्मनी टोळीवर मोकाअंतर्गत कारवाई केली आहे.ही कारवाई कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मा.सुनिल फुल्लारी यांनी केली.
कोल्हापुरचे पोलिस अधीक्षक मा.महेद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्याच्या प्रभारीना रेकॉर्ड वरील गुन्हेगारांची माहिती घेऊन तसेच त्यांच्यावर विविध प्रकारचे गुन्ह्याची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई साठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्या प्रमाणे इंचलकरंजी येथील जर्मनी टोळीवर इंचलकरंजी पोलिस ठाण्यात विवीध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.
या टोळीने इंचलकरंजी येथील हॉटेल व्यावसायिक उमेश मदन म्हात्रे यांना दि.18/08/2023रोजी साडे बाराच्या सुमारास येऊन त्यांना आणि त्यांच्या मुलास शिवीगाळ करुन चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने ड्रॉव्हर मधील सात हजार रुपये घेऊन धमकी दिल्याने उमेश म्हात्रे यांनी 18/08/2023 रोजी जर्मनी टोळीच्या विरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.या गुन्ह्याचा प्राथमिक तपास पोसई मनोज पाटील यांनी केला होता.गुन्हयाच्या तपासात पोलिस रेकॉर्डवरील जर्मनी टोळीचा प्रमुख आनंदा शेखर जाधव उर्फ जर्मनी,अविनाश शेखर जाधव उर्फ जर्मनी (दोघे रा.कबनूर) बंजरंग अरुण फाले ( रा.लिगाडे मळा जवाहरनगर ,इंचल.) शुभम सदाशिव पट्टणकुडे (रा.कबनूर) अमृत उर्फ अमर नारायण शिंगे (रा.रुई) मेहबूब पठाण (रा.इंचलकरंजी) विवेक उर्फ श्री विश्वास लोखंडे (रा.स्वामी मळा,इंचल)अशी त्यांची नावे आहेत. यांच्यावर खून ,खूनाचा प्रयत्न,दरोडा ,जबरी चोरी ,खंडणी वसुली ,अपहरण,प्राणघातक हल्ला आणि घरफोडी अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याने या आरोपीच्या विरोधात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण (मोका) अधिनियम अन्वये कारवाई करण्यासाठी पोलिस अधीक्षक यांच्याकडे प्रस्ताव सादर करुन तो प्रस्ताव कोल्हापूर परिक्षेत्राचे मा.पोलिस महानिरिक्षक यांच्याकडे मोका अंतर्गत कारवाई साठी पाठविला होता.सदर प्रस्तावाची पडताळणी करून गुन्हेगारी टोळी मोडीत काढून त्यांच्यावर वचक बसण्यासाठी मोका अंतर्गत कारवाईची परवानगी दिली.सदर गुन्हयाचा तपास इंचलकरंजीचे उपविभागीय पोलिस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्याकडे देण्यात आला.
स.न.2022 पासून आज अखेर कोल्हापूर जिल्हा पोलिस दलाने 5 मोका अंतर्गत 56 आरोपीच्या विरोधात मोका अंतर्गत कारवाई केली असून MPDA च्या अंतर्गत 22 प्रस्ताव सादर केले होते त्यात 5 जणांना स्थानबद्ध केले तर 3 जणांची चौकशी चालू आहे.म.पो.का.क.55 प्रमाणे 69 जण हद्दपार केले असून 9 प्रस्तावात 41सराईत गुन्हेगारांच्या विरुध्द चौकशी चालू आहे.त्याच प्रमाणे 56 अंतर्गत 155 प्रस्ताव सादर केले असून त्यात 41 जण हद्दपार केले आहेत.
उर्वरित प्रस्तावाची चौकशी चालू असून भविष्यात कोल्हापूर जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारी आणि असलेल्या टोळ्याच्यावर मोका ,हद्दपार आणि MPDA सारख्या कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.