प्रेस मीडिया लाईव्ह :
पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी : भरत शिंदे
हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे येथे पायोनियर हायस्कूल आहे हायस्कूल मधील सण 1996 97 वर्षांमध्ये इयत्ता दहावी मध्ये शिक्षण घेतलेल्या माझी विद्यार्थ्यांचा तब्बल 27 वर्षानंतर दुसऱ्यांदा स्नेह मेळावा संपन्न झाला हा स्नेह मेळावा आळते येथील निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या धुळोबा रामलिंग रोडवरील ग्रामीण खाद्य संस्कृती हॉटेल मध्ये आयोजित केला होता .
जवळ जवळ 44 विद्यार्थी विद्यार्थिनी या मेळाव्यास उपस्थिती दर्शविली होती प्रथमता संदीप शिंदे ;चंद्रकांत चौगुले ;संजय इंगवले; संगीता चौगुले ;शुभांगी चौगुले ;साधना कामत ;संध्या जाधव यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तर नंतर प्रत्येकाने आपला परिचय करून दिला त्यामध्ये दहावीचे परीक्षा दिल्यानंतर प्रत्येकाने आपले करिअर आपापल्या क्षेत्रामध्ये घडवले कोण इंजिनियर, डॉक्टर ,शिक्षक, वकील ,उद्योजक ,व्यावसायिक, व शेती मध्ये सुद्धा आपले करिअर केले आहे असे सर्वांनी एकत्र येऊन गप्पागोष्टी करून आनंद उत्सव साजरा केला दुपारच्या क्षेत्रामध्ये स्नेहभोजनाचा एकत्रित आस्वाद घेतला त्यानंतर फनी गेम्स, संगीत खुर्ची ,गाण्याच्या भेंड्या ,असे विविध प्रकारचे खेळाचा आनंद घेतला व खास करून सुरेख असा गीत गायनाचा कार्यक्रम आमचे मित्र सरदार उर्फ बंडू पाटील, किरण सूर्यवंशी ,अमोल पाटील, यांनी सादर केला या स्नेह मेळाव्याच्या वेळी दमयंती जत्राटे, रूपाली देसाई साधना कामत धनाजी पाटील चंद्रकांत चौगुले सुकुमार पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी सर्वांना एकत्र आणण्याचे काम एक महिना कष्ट करून अमर रोकडे सचिन आलमने अजित झावरे रूपाली देसाई यांनी पार पाडले त्यांना सर्वांनी साथ दिली व हा स्नेह मेळावा अतिशय आनंदाने संपन्न करण्यात आला
शेवटी सर्वांनी चहापान करून कार्यक्रमाची सांगता केली व आभार रावसाहेब आलमाने यांनी मांडले