प्रेस मीडिया लाईव्ह :
अकोला : नारी शक्ति सेवा फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष सुमय्या अली यांनी केला महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाचा भांडाफोड , गेल्या ३ महिन्यापासून प्रभाग क्रमांक १ मधील भारत नगर येथील नागरीकांना पिण्याचे पाण्यासाठी महानगरपालिका पाणीपुरवठा विभाग कडून वंचित ठेवण्यात येत होते त्यामुळे उन्हाळाच्या दिवसात येथील नागरीकांना जीवन जगणे कठीन झाले होते .
या समस्यायाला कंटाळून भारतनगर येथील नागरीक नारीशक्ति सेवा फाउंडेशनच्या कार्यालयावर मोठ्यासंख्याने पोहोचले व सुमय्या अली यांची भेंट घेऊन पाणी विषयी समस्या मांडून आग्रह केला की मॅम आम्ही पाणी टंचाई मूळे सर्व नागरिक त्रस्त झालो आहोत आपण काही तरी करा तेव्हा सुमय्या अली यांनी मनपाचे इंजीनियर व इतर कर्मचारी यांच्याशी फोनवर चर्चा केली असतांना ते पाण्याचा वॉल बंद असतांना खोटे बोलूण कोणतीही पाइपलाइन चोकअप नसतांना पाइपलाइन चौकपचा बहाना दाखवूण दिशाभूल करत टाळमटाळ करत होते .
अखेर नाइलाजाने सुमय्या अली यांनी आपल्या नारी शक्ति सेवा फाउंडेशनच्या टीम आणि भारत नगर येथील काही महिलांना घेऊण स्वतः आपल्या हाताने वाल उघडून पाणी सुरू केले त्या मुळे लोकांना पाणी मिळाले , नागरिकांनी याबाबत समाधान व्यक्त केले सुमय्या अली यांनी पाणी पुरवठा विभागाची कर्मचाऱ्यांना इशारा दिला आहे की या नंतर परत जनतेची दिशाभूल करण्यात आली किंवा पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवण्यात आले तर नारी शक्ति सेवा फाउंडेशन अजिबात खपवून घेणार नाही आणि नारी शक्ति सेवा फाउंडेशन पाणी पुरवठा विभागाच्या विरोधात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही .