जोतिबाच्या नावाने चागभलं च्या गजरात दख्खनचा राजा श्री.जोतिबा राजाची चैत्र यात्रा संपन्न.




प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - श्री.क्षेत्र जोतिबा राजाची लाखों भाविकांच्या उपस्थित सर्वात मोठा चैत्र आज मंगळवारी पहाडे पासून धार्मिक विधीने सुरुवात झाली.या वेळी लाखों भाविक सासनकाट्यासह दाखल झाले होते.आज दुपारी बाराच्या सुमारास कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे ,पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत आणि इतर मान्यवरांच्या हस्ते मानाच्या सासनकाट्याचे पूजन करून भालदार चोपदार यांच्या तोफ़ेच्या सलामीने मिरवणूकीला सुरुवात झाली.

या वेळी लाखों भाविकांनी सासनकाट्यावर गुलाल खोबरयांची उधळण करत जोतिबाच्या नावाने चागभलं असा जयघोष करण्यात आला.सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तोफ़ेच्या सलामीने जोतिबा मंदीरातुन पालखी सोहळा यमाई मंदिराकडे मार्गस्थ झाला .या वेळी भाविकांनी ठिकठिकाणी पालखीवर गुलाल खोबरयांची उधळण करत पालखीचे दर्शन घेऊन भाविक परतीच्या मार्गाला लागले.यमाई मंदीरात  यमाईदेवी आणि जमद्ग्नी यांचा विवाह सोहळा संपन्न झाला.त्या नंतर पालखी जोतिबा मंदीरात परत आल्या नंतर पालखी सोहळ्याची सांगता झाली.या वेळी जोतिबाची शाही थाटात पुजा मांडण्यात आली होती.जोतिबा परिसर भाविकांनी फुलून गेला होता.जोतिबावर बाहेरुन व्यापारीही मोठ्या प्रमाणात येऊन दुकाने थाटली होती.

या वेळी मंदीर परिसरासह ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता.वाहतूक शाखेच्या पोलिसांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवली होती.पोलिसांच्या मदतीसाठी रेस्क्यू फोर्ससह अनिरुध्द उपाध्याय फौडेशनची टीम मदतीला होती.त्याच प्रमाणे देवस्थान समिती आणि कर्मचारी यांनी ही चोख व्यवस्था ठेवली होती.एस.टी.महामंडळाने एस.टी.च्या फ़ेरयां वाढ़वून भाविकांची गैर सोय टाळली.या वेळी एस.टी.चे अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post