हेरले येथे दि 1 मे 5 मे अखेर पंचकल्याण प्रतिष्ठा महा महोत्सवाचे आयोजन

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

 हेरले प्रतिनिधी /  संदीप कोले

 1 मे 5 मे अखेर श्री 1008 भगवान चंद्रप्रभ  मानस्तंभ  द्विद्वादश वर्षपुर्ती निमित्त एवं नवनिर्मित श्रीमद्देवाधिदेव 1008 भगवान मुनिस्रुव्रतनाथ तिर्थंकर जिनबिंब पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव  हातकणंगले तालुक्यातील हेरले येथे  संपन्न होत आहे.

हेरले येथील मंदिर 906 वर्षापूर्वी चे प्राचीन मंदिर आहे. पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव  अध्यात्मयोगी चर्याशिरोमणी प.पु.108आचार्य श्री विशुद्धसागरजी मुनिमहाराज व ससंघ (29पिंच्छी) यांच्या पावन सानिध्यात व नांदणी मठाचे मठाधीपती प .पू .जगद्गुरू जगतपूज्य स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक  पट्टाचार्य महास्वामीजी यांच्या अधिनेतृवाखाली व प.पु स्वतिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी संस्थान मठ कोल्हापूर यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे.

 प्रतिष्ठाचार्य  संजय उपाध्ये व डॉ सम्मेद उपाध्ये हे या पूजेचे विधी करणार असून या पूजा महामहोत्सव साठी मुख्य इंद्र सौधर्म इंद्र इंद्रायणी म्हणून श्री.व सौ सुरेश चौगुले आणि तिर्थंकर माता पिता म्हणून श्री.व सौ. नेमगोंडा पाटील हे लाभले आहेत.

या पाच दिवसाच्या कालावधीत अनेक मंडप उदघाटन, धजारोहन, कळश स्थापना, अखंड दीप प्रज्वलन यासह अनेक धार्मिक विधी, विधान, मंगल प्रवचन, गर्भसंस्कार, मौजीबंधन, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहे तरी सर्वांनी उपस्थित राहून धर्मलाभ घ्यावा असे आवाहन श्री चंद्रप्रभ दिगंबर जैन मंदिर,पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव समिती, वीर सेवा दल, वीर महिला मंडळ, समस्त दिगंबर जैन समाज, हेरले यांनी केले आहे.

या पत्रकार परिषदेसाठी मंदिर कमिटी अध्यक्ष ए.बी. चौगुले , सुरेश चौगुले ,अजित चौगुले, अमोल पाटील, अनिल आलमान,राजेंद्र चौगुले,बाळगोंडा पाटील,नितीन परमाज, राहुल कनवाडे ,कुबेर पाटील यांच्यासह पूजा महामहोत्सव समितीचे सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post