निवडणुकीच्या कामात महापालिकेचे काही अधिकारी आणि कर्मचारी अडकल्याने नागरिकांना होतोय नाहक त्रास
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असून त्यामुळे या कामात महापालिकेचे काही अधिकारी आणि कर्मचारी यांची निवडणुक कार्यालयाकडे नेमणूक केली आहे.त्यामुळे महापालिकेचा काही कार्यालये ओस पडल्याचे चित्र आहे.एखादा नागरिक महापालिकेत कामानिमित्त गेला की तेथे उपस्थित असलेला कर्मचारयांकडे चौकशी केली तर " साहेब इलेक्शन कामात आहेत"असे उत्तर दिले जाते.
या अगोदर अत्यावश्यक सेवेतील अधिकारी आणि कर्मचारी यांना निवडणुक विभागाने घेतले नव्हते.पण यावेळी अत्यावश्यक सेवेतील अधिकारी आणि कर्मचारी घेतल्याने भागातील कामावर आहे त्या कर्मचारयांच्यावर ताण पडला आहे.यातील बरेच जण महापालिकेत फिरकत सुध्दा नसल्याचे समजते.यातील काही कर्मचारी दुपार प्रर्यत निवडणुकीचे काम करून दुपार नंतर नागरिकांची कामे करावीत अशी काही अधिकारी वर्गाची अपेक्षा असली तरी संबंधित कर्मचारी महापालिकेत फिरकत नाहीत.ही परिस्थिती निवडणुका होई पर्यन्त रहाणार आहे.
यामुळे नागरिकांना आपल्या कामासाठी अनेक हेलपाटे मारावे लागत असून त्यांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.खरोखरच या कर्मचारी आणि अधिकारी वर्ग निवडणुक कामासाठी जात असतील काय असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.ज्यांचे काम महत्वाचे आहे तो दिवसभर कार्यालयात थांबून वारंवार हेलपाटे मारत असतो.मात्र त्या नागरिकांला संबंधित अधिकारी आणि कर्मचारी केंव्हा भेटणार हे सांगीतले जात नाही.त्या मुळे त्या व्यक्तीला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
यातील काही अधिकारी आणि कर्मचारी खरोखरच निवडणुक कामात आहेत.त्यांच्या विभागात नावासह त्यांची यादी लावावी.संबंधित कर्मचारी आणि अधिकारी खरोखरच निवडणुक कामात आहेत की आणखी कुठे आहेत हे समजेल असे काही नागरिकांचे मत आहे.