स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई.
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - परप्रांतिय अट्टल मोटारसायकल चोरटा आवन्ना उर्फ रवि उध्दाप्पा चंदरगी (वय 50.रा.बेटगेरी जि.बेळगाव,कर्नाटक) याला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक करून 6 लाख 80रुपये किमंतीच्या 17 मोटारसायकली जप्त केल्या. कोल्हापुरसह जिल्हयात होत असलेल्या मोटारसायकल चोरीच्या प्रकारात होत असलेली वाढ ही गंभीर बाब असल्याने पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर यांना रेकॉर्ड वरील गुन्हेंगारांची माहिती घेऊन गुन्हें उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्या होत्या.
त्या नुसार या पथकाने तपास पथके तयार करून तपास चालू केला असता पोलिस रेकॉर्डवरील चोरटा आवन्ना उर्फ रवि उध्दाप्पा चंदरगी (वय 50.रा.बेटगेरी जि.बेळगाव ,कर्नाटक ) हा चोरीतील मोटारसायकल घेऊन गडहिंग्ल्ज ते संकेश्वर मार्गावरील निलजी फाट्यावर येणार असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी त्या परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता ही मोटारसायकल चोरीतील असल्याची कबुली दिली असता त्याच्या कडील 6 लाख 80 हजार रुपये किमंतीच्या 17 मोटारसायकली जप्त करून त्याला अटक केली.त्याच्यावर मोटारसायकल चोरीचे 17 गुन्हे लक्ष्मीपुरी ,शाहुपुरी ,राजारामपुरी ,जुना राजवाडा,इंचलकरंजी ,मिरज शहरासह हुक्केरी (कर्नाटक) या पोलिस ठाण्यात दाखल आहेत.त्या स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने मोठ्या कौशल्याने तपास करून उघडकीस आणला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत ,अप्पर पोलिस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई,यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर , सहा.पोलिस निरीक्षक सागर वाघ ,पोलिस उपनिरीक्षक संदिप जाधव आणि शेष मोरे यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.