चंदगड तालुक्यातील हाजगोळी येथे झालेल्या खून प्रकरणी एका अल्पवयीन मुलासह एकास अटक.

  स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलिसांची कारवाई.


प्रेस मीडिया लाईव्ह :

कोल्हापूर -चंदगड तालुक्यातील हाजगोळ येथील वसंत पांडुरंग पाटील (65) हे 26/03/24 रोजी हाळ गावच्या शेतात काजू वेचण्यास गेले असता त्या पासून बेपत्ता झाले होते.त्याच्या त्या परिसरात  नातेवाईकांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला असता 29/03/24 रोजी गळा चिरल्याच्या अवस्थेत होळ नदीत मिळून आला.

या बाबतची तक्रार त्याचा मुलगा नंदकुमार वसंत पाटील यांनी चंदगड पोलिस ठाण्यात दिली अ सता पोलिसांनी अपहरण करून खून केल्याचा गुन्हा दाखल केला.या खूनाची माहिती समजताच वरिष्ठ अधिकारी यांनी घटना स्थळी जाऊन पाहणी करून स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकासह पोलिसांना तपासाच्या सूचना दिल्या.पोलिसांनी काही पथके तयार करून शोध घेण्याचा प्रयत्न केला असता स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकास शेतीच्या कारणावरुन पुतण्या बरोबर जोरदार भांडण झाल्याची माहिती मिळाली.पोलिसांनी पुतण्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपला साथीदार गणेश परशुराम जिरुगले (26.रा सोनोली ,बेळगाव )याच्या मदतीने खून केल्याची कबुली दिली असता पोलिसांनी अल्पवयीन मुलासह त्याच्या साथीदारास पुढ़ील तपासासाठी चंदगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

सदर गुन्हयाचा तपास चंदगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विश्वास पाटील हे करीत आहेत.

 या गुन्हयाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने कोणताही पुरावा आणि साक्षीदार नसताना ही केस गुंतागुंतीची असूनही मोठ्या कौशल्याने या खूनाचा तपास करून उघडकीस आणला .

ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत ,अप्पर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे -पाटील,उपविभागीय पोलिस अधिकारी गड.विभाग श्री.रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर ,उपनिरीक्षक शेष मोरे यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.

Post a Comment

Previous Post Next Post