प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
रसायनिक परिसर हा पूर्णपणे गजबजलेला असून येथील लोकसंख्या लाखाच्या घरात आहे , काही नामांकित कंपनी मध्ये काही लोकांना जमिनी विकून पैसे मिळालेले आहेत, तर काही शिक्षक वर्ग अशा पद्धतीने आपली मोल मजुरी करत असतात , एखाद्या बँकेवर आपण विश्वास ठेवून आपण व्याजापोटी पैसे बँकेमध्ये जमा करत असतो जेणेकरून काही पैसे गुंतवल्यानंतर दहा वर्षे पाच वर्षे पंधरा वर्षे वीस वर्षे गुंतवणूक करतो कारण हे पैसे आपल्याला कुठून तरी व्याजापोटी जास्तच जास्त मिळतील मुला मुलींचे शिक्षण , लग्न करता येईल या हेतूने लोक या परिसरातली लोक पैसे गुंतवणूक करत असतात परंतु मोहपाडा येथील एक महिला अशी आहे की तिचं सध्या नाव घेत नाही तिने 17 ते 18 लोकांची फसवणूक केलेली आहे काही दिवसातच तिच्यावरती कारवाई होणार आहे अशी जोरदार चर्चा सुरू आहे तसेच तिच्या बरोबर असणारे साथीदार यांच्यावरती पण कारवाई होईल अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.