कंत्राटी, आऊटसोर्सिंग कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय मजदूर संघाच्या वतीने पुणे येथे संमेलन

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे  : अखिल भारतीय ठेका (Contract) मजदूर महासंघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) वतीने देशभरातील केंद्र सरकार व राज्य सरकार मधील विविध उद्योगातील  स्टील,  रेल्वे,  बॅंक, खाण ,ऑइल कंपनी,  विज, खाण , महानगरपालिका , नगर पालिका, संरक्षण,पेट्रो केमिकल,  सिमेंट,  खते , जहाज बांधणी  व बंदरे,  ईंजिनीयरींग,   व   खाजगी क्षेत्रातील कंत्राटी कामगार संघटनेचे  पदाधिकारी यांचे  राष्ट्रीय  संमेलन शनिवार व रविवार दिनांक सहा व सात एप्रिल 2024 रोजी सौदामिनी सभागृह सदानंद नगर स्वरूप वर्धिनी जवळ पुणे येथे होणार आहे ,                      



  देश भरा मध्ये विविध उद्योगांमध्ये कंत्राटी कामगार कार्यरत असून त्या कंत्राटी कामगारांचे कंत्राटदारांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सामाजिक व आर्थिक शोषण होत असते, वेतना मधुन कमीशन म्हणून रक्कम काढून घेणे,  पी फ,  ई एस आय,  ग्रजुईटी न मिळणे   विविध असलेल्या सामाजिक सुरक्षा योजना चा लाभ न मिळणे,  या बाबतीत तक्रारी दाखल केल्या तर नोकरी जाण्याची भिती,  असाच अनुभव सर्व ठिकाणी आहे      

  या सर्व गोष्टींवर चर्चा विमर्श करून आगामी काळात शासना विरोधामध्ये लढा देण्याची मानसिकता तयार करून देशभरातील कामगारांच्या समस्या या चर्चासत्रामध्ये मांडल्या जातील प्रामुख्याने वेज  सिक्युरिटी , जॉब  सिक्युरिटी आणि सोशल सिक्युरिटी हे तीन महत्वपूर्ण  मुद्दे घेऊन देशभरातील केंद्र शासन तसेच राज्य शासनातील सर्व उद्योगातील कंत्राटी कामगारांच्या हितार्थ या संमेलनामध्ये चर्चा होऊन या सर्व कंत्राटी कामगारांना कशा प्रकारे या सुविधांमध्ये विविध प्रकारे वाढ करून देण्यात येईल ,  याबाबत  भारतीय मजदूर  संघाचे  अखिल भारतीय संघटन मंत्री बी सुरेंद्रनजी ,  मा  राज्य सभा खासदार डाॅ मेधा कुलकर्णी,  अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे अध्यक्ष् व्ही राधाकृष्णन,  भारतीय मजदूर संघ राष्ट्रीय सेक्रेटरी वेलु राधाकृष्णन, भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री अनिल ढुमणे,   कायदेशीर सल्लागार अॅड प्रभाकर धारिया, यांचे मार्गदर्शन होणार आहे, 

महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांचे अध्यक्ष निलेश खरात व पदाधिकारी व  देशभरातील विविध राज्यातील कंत्राटी कामगार संघटने चे  पदाधिकारी या संमेलनासाठी सहा व सात एप्रिल रोजी पुणे येथे उपस्थित असणार आहेत , अशी माहीती अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी दिली आहे.  


Post a Comment

Previous Post Next Post