प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे महानगरपालिके मधील नवीन समाविष्ट गावामध्ये तसेच, जुन्या हद्दीतील ज्याठिकाणी पाण्याचा तुटवडा आहे त्या ठिकाणी पुणे महानगरपालिकेमार्फत टँकर दिले जातात.सदर टैकर पूर्णपणे मोफत दिले जातात. यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही. तथापि, वर्तमानपत्राद्वारे आणि नागरिकांकडून प्राप्त तक्रारीनुसार संबंधित टँकर चालक किंवा ड्रायव्हर सदर टँकर करिता पैसे मागत असल्याचे निदर्शनास आले आहे.
सबब, नागरिकांना असे आवाहन करण्यात येते की, अशा प्रकरणी टॅकर चालक, ड्रायव्हर किंवा तद्नुषंगिक अन्य व्यक्तीस पैसे देण्यात येऊ नयेत . कोणत्याही प्रकारे पैशाची मागणी केल्यास सदर टँकर क्रमांक, संबंधित व्यक्तीचे नाव, तक्रारदाराचे नाव, पत्ता, दुरध्वनी क्रमांकासह पुणे महानगरपालिकेचा टोल फ्री क्रमांक १८००१०३०२२२ व व्हॉट्सोप मोबाईल क्रमांक ८८८८२५१००१ वर तक्रार करण्यात यावी किंवा PMC CARE App डाउनलोड करुन त्यावर फोटो आणि पुराव्यासह तक्रार नौंदवावी. सदर तक्रारीची पुणे महानगरपालिका प्रशासनामार्फत तात्काळ दखल घेण्यात येईल.
(नंदकिशोर जगताप)
मुख्य अभियंता ( पाणीपुरवठा ),
पुणे महानगरपालिका.