प्रेस मीडिया लाईव्ह :
वंचित बहुजन आघाडी पक्षाचे पुणे लोकसभेचे उमेदवार वसंत मोरे यांनी प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी पक्षाने दिलेल्या उमेदवारीतून पुणे शहरातून पहिला खासदार म्हणून 100 टक्के निवडून येऊ असा विश्वास व्यक्त केला.
लोकसभा उमेदवार म्हणून जाहीर झाल्यानंतर काल रात्री ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आले होते काल राज्यातील पाच उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर त्यात पुणे जागेसाठी मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांचा समावेश होता, तर उमेदवार वसंत मोरे यांच्या स्वागतासाठी वंचित पुणे शहराच्या वतीने सर्व कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात उपस्थित होते.
यावेळी मोरे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
पत्रकारांशी बोलताना वसंत मोरे यांनी विविध राजकीय, सामाजिक विषयांवर आपल्या प्रतिक्रिया देत आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. वंचित बहुजन समाजातील नागरिकांच्या पाठिंब्याने व प्रस्थापित पक्षांना त्यांची जागा दाखवून दिल्यास वंचित 100 टक्के विजयी होणार असल्याचे मोरे म्हणाले. "शहरातील मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विविध प्रश्नांवर मी सुरुवातीपासूनच आवाज उठवला आहे. जरंगे पाट