प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : . पुण्यातील वडगाव शेरी येथील भाजपच्या माजी नगरसेविका शितल ज्ञानेश्वर शिंदे ( वय ४१) यांचे बुधवारी रात्री अकरा वाजता निधन झाले . वडगाव शेरी येथून दोन वेळा निवडून आलेले माजी नगरसेवक ज्ञानेश्वर शिंदे यांच्या त्या पत्नी होत्या.
एक महिन्यापूर्वी त्यांच्यासोबत एक घटना घडली होती. त्या अंगणामध्ये सॅनिटायझर टाकून पाला पाचोळा पेटवत होत्या. त्यावेळी सॅनिटायझरचा भडका झाल्यामुळे आगीत त्या भाजल्या होत्या. त्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान मध्यंतरी त्यांची प्रकृती सुधारली होती. परंतु काही दिवसांपूर्वी त्यांना पुन्हा इन्फेक्शन झालं. त्यामुळे त्यांची प्रकृती ढासळली होती. ३ एप्रिल रात्री अकरा वाजता त्यांनी शेवटचा श्वास घेतला .भाजपच्या माजी नगरसेविका शितल ज्ञानेश्वर शिंदे या पुणे महानगरपालिकेची २०१७ ची सार्वत्रिक निवडणूक जिंकल्या होत्या.त्यांनी वडगाव शेरी भागातील अनेक विकास कामांमध्ये पुढाकार घेतला होता. तसंच मोठा निधी पुणे महानगरपालिकेमार्फत उपलब्ध करून दिला होता. त्यांच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.