प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे लोकसभा निवडणुकीत महविकास आघाडी व इंडिया आघाडी मित्रपक्षांचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आमदार रविंद्र धंगेकर यांच्या निवडणूक प्रचार प्रमुख पदी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व माजी आमदार मोहन जोशी यांची नेमणूक करण्यात आली आहे. तशा आशयाचे पत्र उमेदवार आमदार रविंद्र धंगेकर यांनी मोहन जोशींना दिले.
मोहन जोशी यांच्यावर अ. भा. काँग्रेस महासमितीने कर्नाटक व तेलंगाणा राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या निरीक्षक पदाची जबाबदारी सोपवली होती. ही जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेलून या दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेस पक्षाला विजय मिळवून देण्यात मोठे योगदान दिले. तसेच पुण्यातील कसबा विधानसभा मतदार संघातील पोट निवडणुकीतही कॉंग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या निवडणुकीच्या प्रचाराची धुरा त्यांनी समर्थपणे सांभाळली.
‘काँग्रेस पक्षासह महाविकास आघाडी व इंडिया आघाडी मित्रपक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते या सर्वांना सोबत घेऊन आम्ही ही निवडणूक लढवू आणि जिंकू’ असा विश्वास निवडणूक प्रचार प्रमुख मोहन जोशी यांनी व्यक्त केला. ते म्हणले ‘ या निवडणुकीत आमचा उमेदवार रविंद्र धंगेकर हे कार्यक्षम व लोकप्रिय उमेदवार आहेत. पुण्याच्या प्रश्नांची त्यांना चांगली जाण आहे. अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने आमचा प्रचार होईल. तसेच प्रचाराची पातळी चांगली राहील ,यासाठी देखील आम्ही दक्ष राहू असे ते म्हणाले.
सोबत - नेमणूक पत्र.
आपला स्नेहांकित.
रमेश अय्यर.
प्रांतिक सदस्य.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी.
९८८११४४३८२.