पुणे रेल्वे स्थानक परिसरातून ७ महिन्यांच्या चिमुकल्याचे अपहरण



प्रेस मीडिया लाईव्ह :

 पुणे  :  सात महिन्यांच्या चिमुकल्याल्या  बाळाचे अपहरण पुणे रेल्वे स्थानक परिसरातून झाल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.श्रावण अजय तेलंग, असे अपहरण झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे.  याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू केला आहे. या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत अजय तेलंग यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेलंग दाम्पत्य मूळचे भुसावळचे असून ते पुण्यात आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आले होते. शनिवारी मध्यरात्री तेलंग दाम्पत्य पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात झोपले होते.त्या वेळी अनोळखी व्यक्तीने तेलंग यांचा ७ महिन्यांचा मुलगा श्रावण याला उचलून नेले. तेलंग दाम्पत्याला जाग आली. तेव्हा श्रावण जागेवर नसल्याचे आढळून आले. त्यांनी आजूबाजूला शोधाशोध घेतली असता, तो कुठेही दिसून आला नाही. यानंतर घाबरलेल्या तेलंग दाम्पत्याने बंडगार्डन पोलीस ठाण्यात   तक्रार दाखल केली.

पोलिसांनी या व्यक्तीचा शोध सुरू केला असून स्टेशन परिसरातील रिक्षाचालक, उपहारगृहचालक, फेरीवाल्यांकडे चौकशी करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास बंडगार्डन पोलिसांकडून करण्यात येत आहे.




·



Post a Comment

Previous Post Next Post