शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर यांच्या विजयासाठी कार्यकर्ते मेळावा

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे :  पुणे लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांना विक्रमी मतांची आघाडी देण्यासाठी शिवाजीनगर विधान सभा मतदारसंघात महाविकास आघाडीने व इंडिया आघाडीने  कंबर कसली आहे. मतदार संघात, जेष्ठ नेते शरद पवार, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आदित्य ठाकरे, उपनेत्या सुषमा अंधारे, नसीम खान यांची जाहीर सभा तसेच रॅली आयोजित करण्यात येणार आहे. राम रामनवमी निमित्त कार्यक्रम व फेरी काढण्यात येणार आहे. शिवाजी नगर विधानसभा मतदारसंघात प्रत्येकाच्या घरी जाऊन धंगेकर यांना मतदान करून लोकशाही जिवंत ठेवण्याचे आवाहन करण्यात येणार आहे यासह कोपरा सभा घेऊन   जनसामान्यांच्या अन्यायाला वाचा फोडणाऱ्या उमेदवार धंगेकर यांना आपले मत द्या असे, आवाहन करण्यात येणार आहे, अशा सूचना यावेळी कार्यकर्त्यांना देण्यात आल्या.

         पुणे लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या शिवाजी नगर विधान सभा मतदार संघात प्रचारासाठी   महाविकास आघाडी व इंडिया आघाडी च्या वतीने काँग्रेस भवन येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी आमदार दीप्ती चवधरी, माजी नगरसेवक दत्ता बहिरट, काँग्रेसचे मनीष आनंद, काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राजेंद्र भुतडा, सोशल मीडिया अध्यक्ष गुलाम हुसेन, बाळासाहेब उद्धव ठाकरे शिवसेनेचे उमेश वाघ, करुणा घाडगे, प्रवीण डोंगरे, ब्लॉक अध्यक्ष अजित जाधव, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उदय महाले, संजय कुरकुटे, प्रशांत मोरे,आनंद मंजलकर, नारायण पाटोळे, राहुल वंजारी, नाना वाळके, संदीप मोरे, भारत पवार, संजय मोरे, फैयाज शेख, आम आदमी पक्षाचे मुकुंद किर्दत, संजय मोरे, संदीप मोरे,  यांच्यासह महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

   सोशल मीडियावर रवींद्र धंगेकर यांचा प्रचार करावा, तसेच त्यांना घराघरांत पोहचविण्यासाठी मतदान जागृती करण्यात येणार आहे. पदयात्रा, रॅली,  कोपरा सभा, मेळावे घेऊन धंगेकर यांना विक्रमी मतांनी निवडून आणण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून धंगेकर यांना विक्रमी मतांनी विजयी करण्यात येणार आहे. मोदी सरकार विषयी जनतेत प्रचंड असंतोष आहे, ते मतदानातून जनता दाखवून देणार अशी भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

अरविंद शिंदे 

अध्यक्ष, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी 

 ९६८९९३४५७६

Post a Comment

Previous Post Next Post