पुढील 15 दिवस उष्णतेची लाट पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कायम राहणार

 

प्रेस मीडिया लाईव्ह : 

पुण्यासह राज्यात अनेक शहरातील  तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. किमान तापमानात देखील वाढ झाली आणि महत्वाचं म्हणजे रात्रीच्या तापमानात देखील चांगलीच वाढ झाली आहे. त्यात पुढील 15 दिवस उष्णतेची लाट पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कायम राहणार आहे. 

पुढील काही दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडामध्ये असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठी वाढ होईल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये सर्वसाधारणतः आपल्याला अशाच प्रकारे तापमानात वाढ होण्याची शक्यता असल्याचं होसाळीकर म्हणाले. सकाळी 12 ते दुपार 3 पर्यंत अतिमहत्त्वाचे नसेल असेल तर बाहेर पडू नका, असा सल्ला पुणे वेध शाळेचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी दिला आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post