माझ्यावर आरोप करण्यापूर्वी विचार करावा तुम्ही निष्ठावंत आहात का ?. ....अनिस सुंडके

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : एका पोर्टल न्यूज वर माहिती देताना काँग्रेस पक्षाचे नेते महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड यांनी सांगितले की एमआयएम पक्ष हे नेहमी भाजपच्या मदतीला उभा राहतो भाजपची बी टीम एमआयएम आहे. पुण्यात एमआयएम पक्षाने उमेदवारी देणे भाजपाच्या पडद्यामागील षडयंत्र आहे. असं खोटं आरोप त्यांनी काल एका पोर्टल न्यूजला दिलेल्या मुलाखत मध्ये सांगितले. व तसेच त्यांनी माझ्यावर सुद्धा आरोप करीत सांगितले की अनिस सुंडके हे नेहमी सोयीनुसार पक्ष बदलण्याचा काम करीत असतो. असे खोटे आरोप करताना त्यांनी विचार केलं पाहिजे की जिनके घर शिशो के होते व दुसरो के घर पर पत्थर नही फेकते.

 अभय छाजेड यांना मी आठवण करून देतो की ज्यावेळी सुरेश कलमाडींच्या नेतृत्व खाली विकास आघाडीची स्थापना झाली याच पुण्यातून तुम्ही काँग्रेस पक्षाचे विरोधात बंडखोरी केली व विकास आघाडी भाजपबरोबर तुम्ही गेला होता. हा ही इतिहास विसरता कामा नये की ज्यावेळी शिवसेनेचे उमेदवार दीपक पायगुडे पूर्वीच्या असलेल्या भवानी पेठ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवीत होते त्यावेळी उघड उघड तुम्ही व तुमच्या सहकाऱ्यांनी व पुण्यातील अनेक काँग्रेस पक्षाचे सध्या आपल्याला निष्ठावंत बोलणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनी तुमच्यासोबत दीपक पायगुडे यांना काँग्रेस पक्षाचे विरोधात जाऊ मतदान देण्यासाठी लोकांना आव्हान केले होते.

  मला व माझ्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी व एमआयएम पक्षाला बदनाम करण्यासाठी जे लोक बोलत आहे की एमआयएम पक्ष भाजपची बी टी आहे. आपल्या माहितीसाठी आम्ही सांगतो की नुकताच काँग्रेस पक्षाचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपमध्ये सामील झाले. काँग्रेस पक्षात राहून भाजपला आतून मदत करणारे तुमच्याच पक्षाचे कोण ते कार्यकर्ते आपणच विचार करावा व भाजपाची खरी बी टीम कोण आहे? याचा प्रथम विचार करा व नंतर दुसऱ्यावर आरोप करावे.

असं प्रत्युत्तर देताना एमआयएम पक्षाचे अधिकृत उमेदवार अनिस सुंडके यांनी अभय छाजेड यांनी केलेले आरोपाचा समाचार घेतला.


आपला विश्वासू 

अनिस सुंडके

अधिकृत उमेदवार एमआयएम पक्ष 

9561111117

Post a Comment

Previous Post Next Post