पुणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या विरुद्ध काँग्रेसतर्फे आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल



प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या विरुद्ध काँग्रेसतर्फे आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुरलीधर मोहोळ यांनी वर्तमानपत्राच्या माध्यमातून "राम मंदिर झाले आता राष्ट्रमंदिरासाठी संकल्प करूयात" या मथळ्याखाली जाहिरात करून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्येतील राममूर्तीच्या पाया पडत आहेत असे छायाचित्र असलेली पत्रके वाटली.

याप्रकरणी माजी आमदार मोहन जोशी व काँग्रेसचे सोशल मीडिया राज्य समन्वयक चैतन्य पुरंदरे यांनी सांगितले की, " राम मंदिराला निवडणुक प्रचाराचा मुद्दा बनवून याद्वारे धार्मिक प्रलोभन दाखवून मोहोळ यांनी मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे." 

आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी पुरंदरे यांनी मोहोळ यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यावर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने पुरंदरे यांची भेट घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

चैतन्य पुरंदरे

महाराष्ट्र काँग्रेस सोशल मीडिया राज्य समन्वयक

98608 20390

Post a Comment

Previous Post Next Post