"जेल का जवाब वोट से" आम आदमी पक्ष राबवणार मोहीम

प्रेस मीडिया लाईव्ह :

आम आदमी पक्षाच्या वतीने 2024 च्या लोकसभा निवडणुका ह्या अत्यंत गांभीर्याने घेतल्या जाणार असून, पक्षाच्यावतीने जरी ही निवडणूक लढवली जाणार नसली तरी, इंडिया फ्रंट आघाडीचा घटक पक्ष असल्याने पूर्ण ताकदीनिशी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना पाठिंबा देणार असल्याचे आम आदमी पक्षाच्या वतीने नवी पेठ येथील पत्रकार भवन मध्ये घेण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात जाहीर करण्यात आले. 

भाजपच्या वतीने हजारो कोटी रुपयांचा करण्यात आलेला इलेक्ट्रॉल बॉण्ड चा घोटाळा घरोघरी जाऊन सर्व मतदारांसमोर उघड करण्याचा यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमताने निर्धार केला.* मागील काही काळात भाजपाकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा चुकीच्या पद्धतीने वापर करत सूडबुद्धीने विरोधी पक्षातील अनेक नेत्यांना जेलमध्ये पाठवले गेले असल्याचे यावेळी बोलले गेले. 

*लोकसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीतील आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोणताही सबळ पुरावा नसताना देखील अटक केली आहे. ही अटक म्हणजे भाजपाने केजरीवालांची वाढती लोकप्रियता पाहून त्यांना प्रचारात उतरू न देण्याचीच एक रणनीती असल्याचे पक्षाच्या वतीने यावेळी सांगण्यात आले.* अशा प्रकारच्या लोकशाहीला मारक असलेल्या घटनांना योग्य वेळी आवर घातला नाही तर या देशात लोकशाही लोप पावून हुकूमशाहीचा उदय नक्कीच होईल अशा प्रकारची भीती यावेळी पक्षाच्या वतीने व्यक्त केली गेली. पुणे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस चे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी देखील कार्यकर्त्यांच्या या मेळाव्याला हजेरी लावून कार्यकर्त्यांना संबोधित केले.

कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात *"जेल का जवाब वोट से"* म्हणजेच तपास यंत्रणांनी केलेल्या कारवाईला न घाबरता जनतेच्या दारात जाऊन त्यांना पक्षाचे विचार पटवून देत प्रस्थापित सत्ताधाऱ्यांनी अवलंबलेल्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात मतदान करण्याचे आवाहन केले जाणार असल्याचे यावेळी पक्षाच्या वतीने सांगण्यात आले. वाढती महागाई, बेरोजगारी यासारख्या मूलभूत प्रश्नांकडून दुर्लक्ष करण्यासाठीच जातीय तेढ निर्माण केली जात असल्याचे देखील यावेळी पक्षाच्या वतीने बोलले गेले. तसेच 2024 च्या निवडणुकीत नागरिकांनी कोणत्याही भूलथापांना बळी न पडता गेल्या दहा वर्षात महागाई किती वाढली आणि कशाप्रकारे वाढली, त्या प्रमाणात रोजगार किती निर्माण झाले या सर्व गोष्टींचा विचार करूनच मतदान करण्याचे आवाहन पक्षाच्या वतीने केले गेले.

ही लोकसभेची निवडणूक सामान्यांचे हक्क आणि बलढ्यांचे व्यावसायिक हित या मध्ये आहे. या लढाईत आम आदमी पार्टी पार्टी ही बिनशर्त इंडीया आघाडीला पुणे शहरात पाठिंबा देत आहे, सामन्याच्या हक्काला साथ देणार आहे. 

*"जेल का जवाब वोट से"* या मोहिमेची आज सुरुवात करत आहोत. इंडिया फ्रंट च्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून यासाठी आम्ही घरा घरात जाऊ.- सुदर्शन जगदाळे शहरअध्यक्ष, आप 

पुणे लोकसभेमध्ये आम आदमी पार्टी चे कार्यकर्ते हे रवींद्र धगेकर यांना निवडून येण्यासाठी म्हत्वाची भुमिका पार पाडतील. यासाठीचा हा मेळावा घेतला होता त्यासाठी मोठ्या संख्येने आप चे सहकारी यांनी जेल का जवाब वोट से यानिम्मिताने पूर्ण पुणे शहरात मोहीम राबवून इंडिया आघाडीचे उमेदवार निवडून आणतील - अमित म्हस्के (अध्यक्ष पुणे शहर आप युवा आघाडी)


आम आदमी पक्ष 

मीडिया टीम

Post a Comment

Previous Post Next Post