प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आ. रवींद्र धंगेकर यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पहिल्या १० दिवसांत संपूर्ण पुणे शहरात १४ जीप यात्रा / पदयात्रा काढून हजारो मतदारंशी थेट संपर्क साधत पहिल्या टप्प्यात प्रचाराचा झंजावात त्यांनी निर्माण केला. प्रत्येक विधानसभा मतदार संघ जीप यात्रा / पदयात्रांद्वारे त्यांनी अक्षरशः पिंजून काढला. त्यामध्ये कसबा – ३, कोथरूड – ३, पर्वती – ३, वडगावशेरी – ३ , आणि पुणे कॅन्टॉन्मेंट व शिवाजीनगर – प्रत्येकी १ अशा जीप यात्रा / पदयात्रांद्वारे त्यांनी सारे मतदार संघ आत्तापर्यंत पिंजून काढले.
काही सकाळी व बहुतांशी संध्याकाळी होणाऱ्या या पदयात्रांचा शुभारंभ उमेदवारी अर्ज भरल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवार १९ एप्रिल रोजी सकाळी पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपतीचे दर्शन घेऊन पदयात्रांना प्रारंभ झाला. त्यामध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि आम आदमी पार्टी यांचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उमेदवार आ. रवींद्र धंगेकर यांच्या सोबत पदयात्रेत सहभागी होत राहिले. पदयात्रांमध्ये प्रमुख पक्षांचे झेंडे डौलाने फडकत राहिले. काँग्रेस पक्षाचे चिन्ह म्हणजे हाताचा पंजा सर्वत्र उंचावले जात होते.
याच परंपरेला साजेशी पदयत्रा रविवार सकाळी पर्वती विधानसभा मतदार संघ व संध्याकाळी शिवाजीनगर मतदार संघात निघाली. ढोल ताशांच्या गजरात ‘झिंदाबाद’ च्या घोषणांनी दुमदुमत राहिलेल्या पदयात्रांमध्ये उमेदवार आ. रवींद्र धंगेकर हजारो नागरिकांना भेटत राहिले. नागरिकांचा प्रतिसादही उत्साहवर्धक होता. ठिकठिकाणी स्वागत केले जात होते. अनेक दुकांनांमध्ये धंगेकरांना आवर्जून बोलावले जात होते. पर्वती मतदार संघातील अप्पर इंदिरा नगर येथून सकाळी ९.३० वाजता सुरु झालेली पदयात्रा दुपारी ३ पर्यंत चालूच राहिली. प्रत्येक ठिकाणी औक्षण, सार्वजनिक गाणेशउत्सोव मंडळांमध्ये श्री गणेशाची आरती, यामुळे पदयात्रेला विलंब होत राहिला मात्र कार्यकर्त्यांचा व नागरिकांचा उत्साह कमी झाला नव्हता.
या पदयात्रेत ॲड. अभय छाजेड, मार्केटयार्ड ब्लॉक अध्यक्ष रमेश सोनकांबळे, पर्वती ब्लॉक अध्यक्ष संतोष पाटोळे, माजी नगरसेवक बंडू नलावडे, भरत सुराणा, स्वप्नील नाईक, प्रथमेश आबनावे, राधिका मखामले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बाळासाहेब ओसवाल, माजी नगरसेविका दिपाली ओसवाल, सचिन जोगदंड, अमोल रासकर, शशिकांत पापळ, महेश कदम राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष शशिकांत तापकीर, पुणे शहर महिला अध्यक्ष मृणाल वाणी, सचिन पासलकर, सचिन अण्णा तावरे, सोनाली उजागरे, विजू पवार, सौरभ माने, तेजस मिसाळ, विद्या कळेकर आदी सहभागी झाले होते.
अरविंद शिंदे अध्यक्ष
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी
९८२२०२०००५