पोलिस आमच्याच नेत्यांना पदाधिकाऱ्यांना धमकावत आहेत - युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांचा आरोप

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : जेथे‌ जेथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा होत आहेत, तेथे तेथे काँग्रेसच्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना पोलिस प्रशासन धमक्या देत आहे. आमच्या लोकांना प्रचारासाठी घराच्या बाहेर पडू दिले जात नाही, असा आरोप युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनी केला. 

पुणे लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडी, इंडिया आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ काँग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत राऊत बोलत होते. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष व लोकसभा निवडणूक प्रचार प्रमुख मोहन जोशी, माजी आमदार उल्हास‌ पवार, प्रदेश सरचिटणीस अॅड. अभय छाजेड,  राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी, प्रदेश युथ काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राउत, प्रदेश प्रभारी उदय भानू व रोहित कुमार, सरचिटणीस अक्षय जैन, प्रथमेश आबनावे, रोहन सुरवसे, इत्यादी उपस्थित होते.

राऊत म्हणाले, राज्यातील अनेक कंपन्या गुजरातला नेल्या, पेपर फुटीचे प्रकार घडत आहेत, अशा घटना रोखण्यासाठी धोरण करणे गरजेचे आहे आणि विद्यार्थ्यांना भरपाई देणे गरजेचे आहे. 

देशात बेरोजगार युवकांची‌ संख्या वाढत आहे. दहा हजाराच्या नोकरीसाठी इंजिनिअर फिरतात. पीएचडी झालेले आणि एमपीएससी अभ्यास‌ करणारे विद्यार्थी सरकारच्या धोरणामुळे नैराश्येत आहेत. न्याय‌ पत्रात काँग्रेसने युवकांसाठी अनेक‌ योजना आणल्या आहेत. 

भारत मोठा की मोदी मोठे, मोदी‌ सरकार, मोदींची गॅरंटी, युवक मंत्री, शिक्षण मंत्री व इतर विभागाचे मंत्री कोण आहेत, हे कोणाला माहिती नाही. केवळ मोदी सरकार मोदी सरकार केले जाते. स्मार्ट सिटीच्या नावाखाली दहा हजार कोटीचे‌ एक सॉफ्टवेअर खरेदी करण्यात आले. सरकारी यंत्रणा भाजपसोबत आहे. पोलिस आमच्या नेत्यांना फोन करून धमकी देतात, निवडणुक सुरू आहे, मग आम्ही काम कसे‌ करायचे. पोलिस आमच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना प्रचारासाठी घराबाहेर निघूच देत नाहीत. मोदींची जिथे‌ जिथे सभा होत आहेत, तिथे हे प्रकार सुरू आहेत. 

---------

गडकरी एक लाखाने पराभूत होतील : 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दहा वर्षात नागपूरसाठी एकही इंडस्ट्री किंवा कंपनी आणली नाही. त्यांनी केवळ आगोदर मंजुर झालेली विविध महाविद्यालये दुसरीकडे नेली, बाकी काही केले नाही. त्यामुळे नागपुरातून गडकरी यांचा एक लाख मताच्या फरकाने पराभव होणार आहे. माजी मंत्री नितीन राऊत यांच्या‌ मतदार संघातून काँग्रेस उमेदवारास पंन्नास ते साठ हजाराचे लीड मिळेल, असेही कुणाल राऊत म्हणाले.


अरविंद शिंदे अध्यक्ष 

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी 

९८२२०२०००५

Post a Comment

Previous Post Next Post