प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : ऑल इंडिया मजलीस-ए- इत्तेहादुल मुसलीमिन पुणे मतदार संघासाठी अनिस सुंडके यांची उमेदवारी अधिकृत घोषणा काल दिनांक १६/०४/२०२४ रोजी रात्री उशिरा करण्यात आली.
आज सकाळी एमआयएम पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार इम्तियाज जलील व प्रदेश कार्यकारणीतील पुणे जिल्हा समेत अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्याची महत्त्वपूर्ण बैठक सकाळी 11 वाजता पार पाडण्यात आली.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पुण्यातील कार्यकर्तांमध्ये उत्साह होता. अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत निवडणूक अर्ज भरण्याची दिनांक लवकरच जाहीर करावी व तसेच पुणे लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरताना एमआयएम पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांची उपस्थिती राहावी याकरिता कार्यकर्तांनी आग्रह केले आहे.
काल रात्री उशिरा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उमेदवार अनिस सुंडके औरंगाबाद येथे मुक्कामी होते. आज दुपारी बारा वाजता औरंगाबाद येथील मीटिंग संपवून ते पुण्याकडे रवाना झाले आहे.
अनिस सुंडके यांचे पुण्यात आगमन
आज दिनांक 17/04/2024 रोजी एमआयएम पक्षाचे अधिकृत उमेदवार अनिस सुंडके सायंकाळी 6.00 वाजता पुणे जिल्हाधिकारी कार्यालय समोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ते पुण्यात दाखल होणार आहे. त्यानंतर त्यांच्या नाना पेठ येथील 428 पेन्शन वाला मस्जिद राहत्या घरी पुणे शहरातील शेकडो एमआयएम पक्षाचे कार्यकर्ते व त्यांना चाहणारा वर्ग पेढे, मिठाई वाटप करून आनंद उत्सव साजरा करणार आहे.
आपला विश्वासू
अनिस सुंडके
9561111117