आम आदमी पार्टी प्रचाराच्या मैदानात

 


PRESS MEDIA LIVE :

पुणे आप जेल का जवाब वोट से केजरीवालांना खोट्या गुन्ह्यामध्ये कुठलाही पुरावा सादर न करता अनेक दिवसापासून तिहार जेलमध्ये ठेवण्यात आले आहे. आम आदमी पार्टीने इंडिया फ्रंट महाराष्ट्र मध्ये महाविकास आघाडीला पाठिंबा देण्यात आला आहे. 

त्याचेच अवचित साधून बारामती लोकसभेचे उमेदवार सुप्रिया सुळे यांचा प्रचार करण्यासाठी आम आदमी पार्टी घरोघरी जाऊन पत्रक वाटणे कोपरा सभा घेणे प्रशांत कांबळे शहराध्यक्ष अनुसूचित जाती यांच्या मार्गदर्शनाखाली हनुमान नगर, सच्चाई माता परिसर आंबेगाव खुर्द या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते नागरिक मिळून संपूर्ण परिसरामध्ये जनजागृती करण्यात आली त्याचबरोबर मतदान करण्याचे सुद्धा आव्हान  करण्यात आले. कोपरा सभेमध्ये बोलत असताना प्रशांत कांबळे यांनी ही लढाई अस्तित्वाची आहे. हुकूमशाही घालून लोकशाही बळकट करायचे आहे. त्यासाठी  प्रत्येकाने मतदान केले पाहिजे ज्या पद्धतीमध्ये बीजेपी सरकार मोदी, शहा यांची हुकूमशाही या भारतामध्ये चालू आहे. शाळा, कॉलेज सरकारी प्रायव्हेट  करण्याचं काम या सरकारने दहा वर्षात केले आहे. ई डी , सीबीआयचा गैर वापर शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही. दहा वर्षात सर्वाधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, मराठा समाजाला त्यांच्या हक्काचा आरक्षण मिळाला नाही. अनेक मराठी बांधवांनी आरक्षणासाठी आत्महत्या केली  इलेक्ट्रॉन बॉण्डच्या माध्यमातून बीजेपी महाघोटाळा करताना दिसत आहे. खोट्या जाहिरातीच्या माध्यमातून संपूर्ण देशाला भ्रमित करण्याचे काम हे सरकार करत आहे. 

भारताचा दुश्मन पाकिस्तान यांच्याकडून सुद्धा इलेक्ट्रॉन बॉण्डच्या माध्यमातून पैसे घेतले आहेत. असा घनगती आरोप सभेच्या माध्यमातून केला. त्यावेळेस सागर पाटील प्रदेश सहसचिव पुणे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे, धनंजय बेनकर महासचिव अक्षय शिंदे, सतीश यादव उपाध्यक्ष अनिल कोंढाळकर क्रीडा उपाध्यक्ष नौशाद अन्सारी युवा उपाध्यक्ष निखिल खंदारे,ऍड.गजानन थरकुडे, भगत सिंग, गजानन भोसले, किरण कद्रे, लक्ष्मण केतन, संतोष शेंबडे,प्रकाश कुंभार, नरेंद्र पारखे, प्रीतम कोंढाळकर,बालाजी कंठेकर, शुभम बिराजदार, ऍड. वैभव जोशी,संतोष थोरात, सुवर्ण धंडे, दिपाली शेंबडे, सारिका केकान पूजा फलके स्वाती कांबळे  गयाबाई जाधव सारिका सिंग दिपाली धंडे,सुनील चव्हाण महादेव चांदणे प्रवीण मिसाळ संभाजी नेटके विजय केगाळ  आप्पा रणदिवे दत्ता काकरे बालाजी सामोसे यदी नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post