प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे पुणे लोकसभा मतदार संघातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार आ. रवींद्र धंगेकर यांचा प्रचार करण्याचे पुणे शहर काँग्रेस जेष्ठ नागरिक संघातर्फे बैठकीत एकमताने ठरवण्यात आले. त्यानुसार संघटनेचे २००० हुन अधिक जेष्ठ नागरिक घरोघरी प्रचार पत्रके वाटायचे व रवींद्र धंगेकरांना निवडून आणण्याचे आवाहन करीत आहेत.
संघटनेचे अध्यक्ष द.स. पोळेकर यांच्या पुढाकाराने ही प्रचार मोहीम सुरु झाली आहे. संघटनेचे कायदा सल्लागार बाळासाहेब बाणखेळे यांनी प्रचाराची रुपरेखा आखली असून या संदर्भात झालेल्या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व लोकसभा निवडणूक प्रचारप्रमुख माजी आमदार मोहन जोशी यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, रवींद्र धंगेकर यांचा पिंड कार्यकर्त्याचा आहे. ते जनतेचे नेते आहेत त्यांना मत म्हणजे पुण्याच्या विकासाला मत हे घरोघरी जाऊन सांगावे असे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले.
अरविंद शिंदे अध्यक्ष
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी
९८२२०२०००५