प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : वंचितमुळे मागील निवडणुकीत भाजपला ताकत मिळाली, हे आंबेडकरी जनतेला समजले आहे. त्यामुळे आंबेडकरी जनता व अनुयायी वंचितच्या सभांना गर्दी करतील. मात्र, देशाचे संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी आंबेडकरी जनता महाविकास आघाडीच्या पाठीमागे उभी राहिल आणि आघाडीच्याच उमेदवारांना मतदान करतील, असा विश्वास आंबेडकरी चळवळीतील संघर्षशील नेतृत्व, प्रबुद्ध साहित्यिक, भीमपुत्र, भारतीय रक्षक आघाडी प्रमुख टेक्सास गायकवाड यांनी व्यक्त केला.
पुणे लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ शनिवारी काँग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत टेक्सास गायकवाड बोलत होते. यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष व लोकसभा निवडणूक प्रचार प्रमुख मोहन जोशी, सरचिटणीस अजित दरेकर, सरचिटणीस वीरेंद्र किराड,संजय बालगुडे, राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी, प्रशांत सुरसे, राज अंबिके आदि उपस्थित होते.
गायकवाड म्हणाले, आज देश आणि देशाचे संविधान धोक्यात आहे, अशा वेळी कट्टर आंबेडकरवादी शांत बसत नाही. त्यामुळे मी भारतीय रक्षक आघाडीचा महाविकास आघाडीला पाठिंबा देण्यासाठी आलोय. मोदी यांच्या हाती देण्याची सत्ता गेली, आता हा माणूस देशाचे वाटोळे करणार, हे मी ओळखले होते, त्यामुळे मी मोदींचीसत्ता आल्यावर 2014 मध्येच काळा दिवस साजरा केला. भारताचे हिटलर मोदी आहेत, तर अमित शहा गोबेल्स आहेत. या दोघांनी कोट्यावधी रुपये खर्च करून राहुल गांधींना पप्पू पप्पू म्हणून बदनाम केले. मोदी यांच्या कारभारामुळे देश अडचणीत आहे. त्यामुळे मोदी शहांना या निवडणुकीत मतदारांनी घडा शिकवला पाहिजे. आजचा काळ पक्ष वाचवण्याचा नाही तर संविधान वाचवण्याचा आहे. दहा वर्षानंतर भाजपने राहुल गांधी यांचे महत्व ओळखले. आज ते म्हणत आहेत, ही लढाई गावकी भावकीची नाही तर मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे.
आंबेडकरी जनतेने केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, अॅड प्रकाश आंबेडकर, बेहेन मायावती यांचा बहुमान राखावा. मात्र त्या सोबतच संविधानाचाही विचार करावा. नेत्यांच्या मानापेक्षा संविधान व बाबासाहेबांचा मान महत्वाचा आहे. मागील लोकसभा निवडणुकीमध्ये वंचितमुळे भाजपला मदत झाली. हे आंबेडकरी जनतेला कळाले आहे. रामदास आठवले हे जातीयवादी व मनुवादी पक्षासोबत असल्याचेही आंबेडकरी जनतेला पटत नाही. त्यामुळे आंबेडकरी जनता प्रकाश आंबेडकर आणि आठवलेंच्या सभांना जातील. मात्र, पक्षाचा अभिनिवेष बाजूला ठेवून संविधान वाचवण्यासाठी महाविकास आघाडीला मतदान करेल.
आंबेडकरी विचाराच्या पक्षांनी आपला पक्ष ग्रामपंचायत, पंचायत समिती इथपासून वाढवण्यास सुरूवात करावी. मात्र, लोकसभेला जातीयवादी व संविधान संपवणार्या शक्तीला रोखण्यासाठी आता महाविकास आघाडीला साथ द्यावी. राहुल गांधींना आंबेडकरी जनतेने समजून घेतले पाहिजे, असेही टेक्सास गायकवाड म्हणाले.
प्रारंभी राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी प्रसाविक केले.
अरविंद शिंदे
अध्यक्ष पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी
९८२२०२०००५