प्रेस मीडिया लाईव्ह :
श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप संचलित "कॉलेज ऑफ एज्युकेशन बी.एड्. पेठ वडगाव" येथे मंगळवार, दिनांक 16 एप्रिल 2024 रोजी महाविद्यालयामध्ये बी.एड्. द्वितीय वर्ष निरोप समारंभ व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे मा. सौ. नविता गणेश नायकुडे मॅडम(उपाध्यक्षा,गुरुकुल स्कूल अब्दुल लाट) व प्रमुख उपस्थितीमध्ये मा. श्री. विजयसिंह माने साहेब (अध्यक्ष,श्री. बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप , संचालक के.डी.सी.सी. कोल्हापूर)तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या डॉ.सौ.निर्मळे आर.एल. इत्यादी मान्यवर उपस्थित होते. प्रथम कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन व वृक्षास जलार्पण करून झाली .कार्यक्रमाचे प्रास्ताविक छात्राध्यापिका वनिता कोंडेकर यांनी केले. तसेच पाहुण्यांची ओळख छात्राध्यापिका स्वरूपा कांदेकर यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत प्राचार्यांच्या हस्ते झाले.पवित्र पोर्टल मधून महाविद्यालयातील बऱ्याच विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झाले आहे, त्याही विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता, प्रथम बी.एड्. प्रथम वर्ष सेमिस्टर एक मधील पाच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर बी.एड्. द्वितीय वर्ष सेमिस्टर तीन मधील पाच विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच पवित्र पोर्टल मार्फत गव्हर्नमेंट सिलेक्शन झालेले माजी विद्यार्थी नम्रता शेट्टी, अनुराधा लायकर, मेघा ओमाण्णा,स्वरा पाटेकर, संग्राम पाटील, धनाजी खेडकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. दरवर्षी महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांची आदर्श छात्राध्यापक व आदर्श छात्राध्यापिका म्हणून निवड करण्यात येते,
यावेळी बी.एड्. द्वितीय वर्षातील छात्राध्यापिका सारिका माने व छात्राध्यापक प्रकाश माने यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. पवित्र पोर्टल मार्फत सिलेक्शन झालेल्या नम्रता शेट्टी, मेघा ओमाण्णा, धनाजी खेडकर या छात्राध्यापकांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि महाविद्यालयाचे मनापासून आभार मानले, तसेच बी.एड्. प्रथम वर्षातील विद्यार्थिनी शर्वरी करपे व शीलाताई पाटील तसेच द्वितीय वर्षातील विद्यार्थिनी दिव्या माने, सारिका माने यांनी आपले मनोगत व्यक्त केले, प्रमुख पाहुण्या नायकुडे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले, त्यांनी आपल्या भाषणामध्ये शिक्षक कसा असावा व त्याच्याकडे कोणती कौशल्ये व क्षमता असाव्यात की ज्यामुळे शिक्षक हा उत्कृष्ट बनू शकेल याविषयी बी.एड्.च्या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांना त्यांनी आपल्या संस्थेमध्ये जॉब साठी ही ऑफर दिली. तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या निर्मळे मॅडम यांनी छात्राध्यापकांना मोलाचे मार्गदर्शन केले, त्यांनी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा, TET,CTET,TAIT यासारख्या परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहन दिले, त्यांनी छात्राध्यापकांना पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या,
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथम वर्षाची छात्राध्यापिका सुनंदा पोवार यांनी केले. या कार्यक्रमामध्ये महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी, दोन्ही वर्षाचे प्रतिनिधी यांचा सत्कार करण्यात आला. बी.एड्. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी आपली आठवण म्हणून महाविद्यालयाला भेटवस्तू दिली.या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी,प्रथम व द्वितीय वर्षातील छात्राध्यापक, छात्राध्यापिका उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रथम वर्षाची छात्राध्यापिका अपर्णा काटकर यांनी मानले, अशा प्रकारे अतिशय उत्तमरीत्या हा कार्यक्रम संपन्न झाला.