प्रेस मीडिया लाईव्ह :
श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक केंद्र अमृत नगर घाटकोपर यांचे वतीने श्री स्वामी समर्थ अमृत भूषण पुरस्कार 2024 लोकप्रिय स्थानिक आ. राम कदम श्रीम सुनिताताई शिंदे महाराष्ट्र उपाध्यक्ष रा काॅ पा ह भ प चंद्रकांत महाराज डुंबरे (माळशेज पतसंस्था अध्यक्ष), ऍड .अशोक गायकर( ब्राह्मणवाडा पतपेढी अध्यक्ष) ,मा. नगरसेविका प्रतीक्षा घुगे, श्री धैर्यशील शितोळे मठाधिपती ,सुनील शिंगोटे जुन्नर शहर मठाधीपती इ. मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला .
तद्प्रसंगी अध्यात्मिक केंद्राचे संचालक व विश्वस्त श्री रवींद्र पाचपुते , अध्यक्षा राजश्री कोल्हे, खजिनदार ललिता राव ,ज्येष्ठ नागरिक कट्टा अध्यक्ष इस्माईल पटेल इ. मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते श्री स्वामी समर्थ स्मरणिका 2024 चे प्रकाशन देखील करण्यात आले श्री स्वामी समर्थ अमृत भूषण पुरस्काराने द स काकडे ज्येष्ठ साहित्यिक श्री रमेश वाणी सिने नाट्य अभिनेते ह भ प चंद्रकांत महाराज डुंबरे (समाज प्रबोधक ,कीर्तनकार) पूर्णिमा शिंदे( सुप्रसिद्ध निवेदिका व साहित्यिका ) ,मयूर सुकाळे (सुप्रसिद्ध गायक सारेगामा) रवींद्र आवटी (रंगकर्मी समाजसेवक) संजय नलावडे (सुप्रसिद्ध स्तंभलेखक) जगन्नाथ लोहिया (सुवर्णपदक विजेते व्हीजेटीआय अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.
तद्प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रविंद्र पाचपुते आणि सौ सानिका हांडे यांनी केले. केंद्र संचालिका शैला पाचपुते सौ. श्वेता वैद्य ,सौ अनन्या तानवडे, सौ खुटाळ आणि सर्व स्वामी सेवेकरी अध्यात्मिक संप्रदाय केंद्र सर्व भक्त गुणीजनांनी हा सोहळा संपन्न होण्यासाठी सहकार्य केले