प्रेस मीडिया लाईव्ह :
आर.एस.एस. ने उज्ज्वल निकम यांना तिकिट देऊन त्यांच्या उपकाराची परतफेड तर केली, पण त्यांना लोकसभेत न पाठविता जेल मध्ये पाठवावे लागेल
२६/११ च्या मुंबई हल्ल्याच्या कोर्टातील सुनावणीमध्ये या हल्ल्याशी संबंधीत आर्.एस्.एस् च्या अतिरेक्यांना वाचविण्याचे फार मोठे काम विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केले होते. त्यातील फक्त दोन मुद्दे खाली दिले आहेत.
१) पाकीस्तानच्या लष्करे तोयबाच्या अतिरेक्यांची बोट मुंबईवर हल्ला करण्यासाठी निघाली असल्याबद्दलची इत्तंभूत माहिती अमेरीकन गुप्तचर यंत्रणेकडून भारताच्या गुप्तचर यंत्रणेला दि. १९ नोव्हें. २००८ रोजीच मिळाली होती. त्या बोटीचे अक्षांश व रेखांशही समजले होते. ही माहिती पुढील कारवाईसाठी मुंबई पोलीस, महाराष्ट्र शासन व पश्चिमी नौदल विभाग यांना कळविण्याची जबाबदारी गुप्तचर यंत्रणेचे तत्कालीन सहसंचालक प्रभाकर अलोक यांची होती. पण त्यांनी ती जाणीवपूर्वक कळविली नाही व हा हल्ला होऊ दिला. त्यामागे त्यांचा नक्कीच काही अप्रामाणिक हेतु होता. भारत सरकारचे तत्कालीन कॅबिनेट सचिव के.एम्. चंद्रशेखर यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणी चौकशी करण्यासाठी जी समिती नियुक्त केली होती त्यांच्या अहवालात वरील सर्व माहिती उघड झाली आहे. या अहवालातील प्रमुख मुद्दे इंडियन एक्स्प्रेस या प्रसिध्द इंग्रजी वर्तमानपत्राच्या तीन अंकात प्रसिध्द केले गेले आहेत (इंडियन एक्स्प्रेस दि. ११ डिेसेंबर २००८, दि. १५ डिसेंबर २००८ व दि. २६ डिसेंबर २००८). श्री. प्रभाकर अलोक यांनी ही माहिती संबंधीतांना वेळीच कळविली असती तर हा हल्ला झालाच नसता व शेकडो लोकांचे बळी गेले नसते. त्यामुळे या हल्ल्यात जे १६८ लोक मृत झाले व शेकडो जखमी झाले त्यासाठी प्रभाकर अलोक हे संपूर्णपणे जबाबदार आहेत. पण विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी हा अत्यंत महत्वाचा मुद्दा कोर्टाच्या निदर्शनास आणला नाही, कारण त्यांना प्रभाकर अलोक यांना वाचवायचे होते कारण त्यांना माहीत होते की प्रभाकर अलोक हे आर्.एस्.एस्. च्या आतील गोटातील आहेत.
२) हेमंत करकरेंच्या शरीरात मिळालेल्या गोळ्या या अजमल कसाब किंवा अबू इस्माईल यांच्या रायफलमधून उडविलेल्या नव्हत्या असे कोर्टाच्या सुनावणीमध्ये सिध्द झाले होते (मुंबई सेशन्स कोर्ट निकालपत्र पान नं. ९२०). त्याशिवाय करकरेंच्या पोस्ट मार्टममध्ये स्पष्ट झाले होते की, त्यांच्या मानेपासून खाली पोटात रिव्हालव्हरने पाच गोळ्या मारल्या होत्या. त्यामुळे रिव्हालव्हरने गोळ्या मारणारा हा आरोपी कोण हे शोधून काढणे आवश्यक होते. पण उज्ज्वल निकम यांनी हा आरोपी शोधून काढण्यासाठी अधिक तपास करण्याचा आग्रह धरला नाही, कारण त्यांना माहीत होते की, मुंबई पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या संजय गोविलकर या अधिकाऱ्याने हे कृत्य केले आहे व तो आर्.एस्.एस्.शी संबंधीत आहे.
अशा प्रकारे उज्ज्वल निकम यांनी आर्.एस्.एस्.वर फार मोठे उपकार केले होते. त्यांना २०२४ च्या लोकसभेचे मुंबई उत्तर मध्य मतदारसंघाचे तिकीट देऊन आर्.एस्.एस्.ने त्यांच्या उपकाराची अंशत: फेड केली आहे. पण वरील सर्व प्रकार समजल्यानंतर त्यांना निवडून देणे तर दूरच, उलट जनता त्यांच्या अटकेची मागणी करू लागेल.
एस्.एम्. मुश्रीफ
आय्.पी.एस्. (निवृत्त)
माजी पोलीस महानिरीक्षक
पुणे. दि. २९ एप्रिल २०२४
"""""""""""""""""""""""""""""""""""""""
मा. अंजुम इनामदार पुणे
9028402814